सलमान खानच्या जुडवामध्ये आणि वरुण धवनच्या जुडवा 2 मध्ये या गोष्टी आहेत सेम टू सेम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2017 14:44 IST2017-09-29T09:14:28+5:302017-09-29T14:44:28+5:30

वरुण धवन, जॅकलिन फर्नांडिस आणि तापसी पन्नूचा जुडवा 2 प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ऐवढेच नव्हे तर चित्रपट रिलीज होताच ...

In Salman Khan's twin and Varun Dhawan's twins, these things are: Same to beans | सलमान खानच्या जुडवामध्ये आणि वरुण धवनच्या जुडवा 2 मध्ये या गोष्टी आहेत सेम टू सेम

सलमान खानच्या जुडवामध्ये आणि वरुण धवनच्या जुडवा 2 मध्ये या गोष्टी आहेत सेम टू सेम

ुण धवन, जॅकलिन फर्नांडिस आणि तापसी पन्नूचा जुडवा 2 प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ऐवढेच नव्हे तर चित्रपट रिलीज होताच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर  50 ते 60 टक्के ऑपनिंग केली आहे. ज्यामुळे या विकेंडला जुडवा 2 हाऊसफुल्ल जाईल असा अंदाज बांधण्यात येतो आहे. 
हा सलमानच्या जुडवाचा सीक्वल आहे. 20 वर्षांपूर्वी रिलीज झालेला सलमान खानचा जुडवा बॉक्स ऑफिसवर हिट गेला होता. सलमानच्या जुडवामध्ये आणि वरुण धवनच्या जुडवा2 मध्ये खूप गोष्टी सारख्या आहेत. ज्या खूप कमी जणांना माहिती आहेत. जुडवाचे दिग्दर्शन डेव्हिड धवन यांनी केले होते तर 20 वर्षांनंतर ही जुडवा 2 चे दिग्दर्शन ही त्यांनीच केले आहे. तसेच ज्यावेळी सलमान खानने या चित्रपटात काम केले होते तेव्हा तो 29 वर्षांचा होता योगा योग म्हणा पण वरुण ही हा चित्रपटत करताना 29 वर्षांचा आहे. हा चित्रपट सलमानचा सगळ्यात सुपरहिट कॉमेडी चित्रपट ठरला होता. त्याचप्रमाणे वरुण धवनच्या आयुष्यात ही चित्रपट माईल्ड स्टोन ठरले. अनुपम खेर जुडवाच्या पहिल्या भागात ही होते आणि वरुणच्या जुडवा मध्ये ही ते आहेत.  'टन टना टन, चलती है क्या 9 से 12'  आणि ‘उंची है बिल्डिंग’ ही दोन्ही गाणी  जुडवा 2मध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहेत.  

ALSO READ : पुन्हा एकदा उडणार निखळ आनंदाचे फवारे...

वरुणच्या जुडवा समोर दुसऱ्या कोणत्याच चित्रपटाचे आव्हान नाही आहे.  त्यामुळे ट्रेंड अनुसार हा चित्रपट वीकेंडला 14 - 15 कोटींचा बिझनेस करले असा अंदाजात लावण्यात येतो आहे. या चित्रपटात सलमान खानने ही कॅमिओ केला आहे. यात करिश्मा कपूरच्या जागा जॅकलिन फेर्नांडिस ने घेतली आहे तर रंभाची जागा तापसी पन्नू घेतली आहे. वरुण यात डबल रोलमध्ये दिसणार आहे.  वरुणचे फॅन्स गेल्या अनेक महिन्यांपासून या चित्रपटाची वाट मोठ्या आतुरतेने पाहात होते. जुडवा 2 नंतर तो ऑक्टोबरमध्ये शूजित सरकारच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग सुरु करणार आहे. 

Web Title: In Salman Khan's twin and Varun Dhawan's twins, these things are: Same to beans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.