सलमान खानच्या ‘ट्यूबलाइट’चे शूटिंग पूर्ण; कबिर खानने प्रेक्षकांसाठी लिहिला हा संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2017 21:12 IST2017-02-07T15:42:34+5:302017-02-07T21:12:34+5:30

सलमान खान याचा बहुचर्चित ‘ट्यूबलाइट’ या सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाले असून, दिग्दर्शक कबीर खान याने शूटिंग संपताच प्रेक्षकांसाठी ट्विटवर ...

Salman Khan's 'Tula Lite' shoot completes; This message was written by Kabir Khan for the audience | सलमान खानच्या ‘ट्यूबलाइट’चे शूटिंग पूर्ण; कबिर खानने प्रेक्षकांसाठी लिहिला हा संदेश

सलमान खानच्या ‘ट्यूबलाइट’चे शूटिंग पूर्ण; कबिर खानने प्रेक्षकांसाठी लिहिला हा संदेश

मान खान याचा बहुचर्चित ‘ट्यूबलाइट’ या सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाले असून, दिग्दर्शक कबीर खान याने शूटिंग संपताच प्रेक्षकांसाठी ट्विटवर एक संदेश लिहिला आहे. कबीर खानने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले की, ‘हा सिनेमा जगला दाखविण्यासाठी मी उत्सुक आहे’. 



‘एक था टायगर, बजरंगी भाईजान’ या सुपरहिट सिनेमांमध्ये कबीर खानसोबत काम करणाºया सलमानचा हा तिसरा सिनेमा आहे. या दोन्ही सिनेमांनी बॉक्स आॅफिसवर कमाईचे अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. आता ‘ट्यूबलाइट’ हा सिनेमादेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, अशी अपेक्षा कबीर खान याने व्यक्त केली. यावेळी कबीरने त्याच्या पूर्ण टीमचा फोटोही शेअर केला. सिनेमामध्ये सलमानबरोबर दिवंगत अभिनेता ओम पुरी, सोहेल खान आणि चिनी अभिनेत्री झू-झू बघावयास मिळणार आहे. 

हा सिनेमा यावर्षी ‘ईद’ला रिलिज होणार असून, सलमान खानचे चाहत्यांमध्ये या सिनेमाविषयी कमालिची उत्सुकता बघावयास मिळत आहे. यावेळी कबीर खानने सलमान खानसोबतचे दोन कोलाज फोटोज् पोस्ट करीत लिहिले की, आमचा एकत्र तिसरा प्रवास समाप्त झाला आहे. आता मी हा सिनेमा जगाला दाखविण्यास आतुर झालो आहे. 

ट्यूबलाइटची शूटिंग लेह, लद्दाख आणि मनाली येथे झाली आहे. सिनेमात किंग खान शाहरूखही कॅमियो करताना बघावयास मिळणार आहे. कबीर खानने गेल्या सोमवारीच ब्रांद्रा येथे सिनेमाची रॅप अप पार्टी दिली होती. पार्टीत सिनेमातील संपूर्ण क्रू सहभागी झाले होते. पार्टीत सलमान त्याची कथित गर्लफ्रेंड यूलिया वंतूर हिच्यासोबत आला होता. 



कबीर खान याचा विवाह टीव्ही कलाकार मिनी माथून हिच्याशी झाला होता. दिग्दर्शक म्हणून त्याने २००६ मध्ये करिअरला सुरुवात केली होती. ‘काबुल एक्स्प्रेस’ हा त्याचा पहिला सिनेमा होता. २०१५ मध्ये आलेल्या त्याच्या ‘बजरंगी भाईजान’ या सिनेमाने बॉक्स आॅफिसवर कमाईचे एकापेक्षा एक रेकॉर्ड केले होते. तर सलमानचा ‘सुल्तान’ हा सिनेमा २०१६ मध्ये आला होता. आता त्याचा ट्यूबलाइट यावर्षी रिलिज होणार आहे. या सिनेमानंतर सलमान एक था टायगरचा सीक्वल ‘टायगर जिंदा है’ यामध्ये काम करणार आहे. 

Web Title: Salman Khan's 'Tula Lite' shoot completes; This message was written by Kabir Khan for the audience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.