सलमान खानमुळे सैफ अली खानला 'रेस 3' मधून दाखवण्यात आला बाहेरचा रस्ता ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2017 12:59 IST2017-08-16T07:24:08+5:302017-08-16T12:59:28+5:30
सलमान खान 'रेस 3' चित्रपटात काम करण्यासाठी होकार दिल्याचे समजते आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कोरियोग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसूजा ...

सलमान खानमुळे सैफ अली खानला 'रेस 3' मधून दाखवण्यात आला बाहेरचा रस्ता ?
स मान खान 'रेस 3' चित्रपटात काम करण्यासाठी होकार दिल्याचे समजते आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कोरियोग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसूजा करणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार चित्रपटच्या मकेर्सनी सैफ अली खानला 'रेस 3' मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. एक वेबसाईटच्या रिपोर्टनुसार चित्रपटाचा निर्माता रमेश तुरानीने सलमान खानला साईन करत सैफला चित्रपटातून डच्चू दिला आहे.
सैफ अली खान या आधी रेस आणि रेस2 चा भाग होता. दोन्ही चित्रपटात सैफ अली खानची मुख्य भूमिका होती. त्यामुळे सैफ अली खानला या चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवणे तशी विचार करायला लावणारीच गोष्ट आहे. गेल्या काही दिवसांपासून सैफचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली कमाल दाखवण्यात अपयशी ठरले होते हे ही त्यामागचे एक कारण असू शकते. सैफचा हमशकल्श आणि रंगून दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले होते. मात्र रेसमधून सैफला बाहेर जाण्याचा रस्ता दाखवला आहे याबाबची अजूनपर्यंत कोणतीच अधिकृत घोषणा करण्यात झालेली नाही. याचित्रपटात सलमान खानच्या अपोझिट कोणती अभिनेत्री दिसणार याचा ही निर्णय झालेला नाही. मात्र लवकरच याबाबतची घोषणा होण्याची शक्यता आहे.
ALSO READ : मॉम-डॅडसोबत पहिल्या फॉरेन ट्रीपवरून परतला तैमूर अली खान!
सध्या सलमान खान स्वत: त्याचा आगामी चित्रपट टायगर जिंदा है च्या चित्रिकरणात बिझी आहे. ज्यात त्याच्यासोबत कॅटरिना कैफ दिसणार आहे. हा चित्रपट ख्रिसमसमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अली अब्बास जफर याचित्रपटाचे दिग्दर्शन करतोय. हा चित्रपट एक था टायगरचा सीक्वल आहे.