सलमान खानची नवीन दबंगगिरी, म्हणतोय - जय जवान, जय किसान!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 19:12 IST2020-07-13T19:12:02+5:302020-07-13T19:12:16+5:30
सलमान खानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे आणि त्याचे चाहते प्रशंसादेखील करत आहेत.

सलमान खानची नवीन दबंगगिरी, म्हणतोय - जय जवान, जय किसान!
शूटिंग बंद असल्यामुळे कलाकार वेगवेगळ्या गोष्टी करताना दिसत आहेत. बिझी शेड्युलमुळे ज्या गोष्टी करता येत नव्हत्या, त्या गोष्टी करताना कलाकार दिसत आहेत. यादरम्यान सलमान खानचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोत तो शेतात काम करताना दिसतो आहे. सध्या सलमान पनवेलमधील त्याच्या फार्महाउसवर वेळ व्यतित करत आहे. या लॉकडाउनमध्ये त्याने कोरोनामध्ये अडचणीत सापडलेल्या लोकांची मदत केली. शिवाय दोन गाणीदेखील रिलीज केली.
नुकताच सलमान खानने त्याच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेयर केला आहे. या फोटोमध्ये तो शेतात काम करताना दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्याचे चाहते सलमानचे भरभरून कौतुक करताना दिसत आहेत.
या फोटोला सलमानने कॅप्शन देताना लिहले आहे कि, 'दाने दाने पे लिखा होता है, खाने वाले का नाम. जय जवान, जय किसान' त्यामुळे दबंग खानचा हा शेती करतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तो राधे युअर मोस्ट वॉण्टेड भाई चित्रपटाची तयारी करतो आहे. या सिनेमाचे थोडे शूटिंग बाकी आहे. हे शूट आता स्टुडिओत केले जाणार आहे. हे शूट परदेशात होणार होते. या सिनेमाची टीम हिरव्या रंगाच्या स्क्रीनवर हा सिनेमाचे शूटिंग करणार आहे आणि एडिटिंगमध्ये परदेश दाखवले जाईल.
एक्शन सीक्वेन्स शहरातील एका स्टुडिओत शूट केले जाईल. सिनेमाचे दहा ते बारा दिवसाचे काम बाकी आहे. पुढील महिन्यात उर्वरीत शूटिंगला सुरूवात होण्याची शक्यता आहे.