सलमान खानच्या ‘ट्यूबलाईट’मध्ये शाहरुख खानचा असा असेल टॅटू लूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2017 15:30 IST2017-01-16T15:30:44+5:302017-01-16T15:30:44+5:30
एकेकाळचे ‘जानी दुश्मान’ सलमान खान आणि शाहरुख सुमारे दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र येत आहेत . कबीर ...
.jpg)
सलमान खानच्या ‘ट्यूबलाईट’मध्ये शाहरुख खानचा असा असेल टॅटू लूक
ए ेकाळचे ‘जानी दुश्मान’ सलमान खान आणि शाहरुख सुमारे दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र येत आहेत. कबीर खान दिग्दर्शित ‘ट्युबलाईट’ या सिनेमात शाहरुख पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार ही न्यूज कळताच चाहत्यांमध्ये आनंदाचे भरते आले.
दोन खान एकत्र म्हटल्यावर चर्चा तर होणारच! पण आता त्याही पुढे जाऊन आम्ही तुम्हाला एक खुश खबर देणार आहोत. या चित्रपटात शाहरुखचा लूक कसा असेल याची पक्की माहिती आमच्याकडे आहे. तर मग तुमची उत्सुकता अधिक न ताणून धरता सांगतो की, या चित्रपटात किंग खानच्या चेहऱ्यावर टॅटू असणार आहे.
आश्चर्य वाटले ना? नुकतेच या सिनेमाच्या सेटवरील काही फोटो इंटरनेटवर दाखल झाले आणि त्याचा लूक बाहेर पडला. एका चाहत्याने सेटवर शाहरुख व सलमानसोबत काढलेले फोटो सोशल मीडियावर अपलोड केले. त्यामध्ये शाहरुखच्या चेहऱ्यावर डोळ्यांभोवती टॅटू स्पष्ट दिसतो.
हा टॅटू पाहून माईक टायसनच्या कुप्रसिद्ध फेस टॅटूची आठवण जरी होत असली तरी शाहरुखचा टॅटू छान दिसतोय. आता त्याचा लूक जरी कळाला असला तरी त्याची भूमिका काय असणार याबाबत मात्र कमालीची गुप्तता पाळण्यात येतेय. काय सांगता व्हिलन बनून तो सलमानशी दोन हात करताना दिसेल? कसलीच शक्यता नाकारता येत नाही.
![SRK with Salman on Tubelight Set]()
कॅटरिना कैफच्या बर्थडे पार्टीमध्ये झालेल्या भांडणानंतर सुमारे आठ वर्षे या दोन्ही खानांमध्ये वैमनस्य कायम होते. परंतु सलमानची बहीण अर्पिताच्या लग्नात त्यांनी सगळे मतेभेद व राग विसरून पुन्हा एकदा मैत्री केली. आता तर हे बॉलीवूडचे करण-अर्जुन एमेकांशिवाय राहत नाही. एकमेकांच्या चित्रपटांचे पोस्टर काय रिलीज करतात, प्रदर्शनाची तारीख काय घोषित करतात.
cnxoldfiles/a>. ‘ओम शांती ओम’मध्ये या दोघांनी शेवटचे एकत्र काम केले होते. त्यानंतर आता दहा वर्षांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर त्यांची भेट होणार आहे.