कॅटरिना कैफ एन्जॉय करतेय सलमान खानसोबत निवांत क्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2017 17:58 IST2017-05-16T12:18:53+5:302017-05-16T17:58:28+5:30

सध्या सलमान खान आणि कॅटरिना कैफ त्यांचा आगामी चित्रपट टायगर जिंदा है चे शूटिंग करतायेत. आबू धाबीमध्ये या चित्रपटाचे ...

Salman Khan's lasting moments with Katrina Kaif enjoy | कॅटरिना कैफ एन्जॉय करतेय सलमान खानसोबत निवांत क्षण

कॅटरिना कैफ एन्जॉय करतेय सलमान खानसोबत निवांत क्षण

्या सलमान खान आणि कॅटरिना कैफ त्यांचा आगामी चित्रपट टायगर जिंदा है चे शूटिंग करतायेत. आबू धाबीमध्ये या चित्रपटाचे सध्या चित्रिकरण सुरु आहे. याआधी याच चित्रपटाच्या शूटिंगसाठी दोघे ऑस्ट्रियामध्ये गेले होते. याठिकाणी त्यांनी चित्रपटातील एका रोमँटिक गाण्याचे शूटिंग केले. कॅटरिना ही सलमानची पूर्व प्रियसी असली तरी सध्या त्या दोघांमध्ये चांगले मैत्रिचे नाते झाले आहे. कॅटरिनाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या फोटोजमधून काही असेच दिसते आहे.

या फोटोमध्ये सलमान खान आणि कॅटरिना कैफ एक स्किमिंग पूलच्या जवळ बसलेले दिसता येत. सलमान खान पुढे बसलाय तर कॅटरिना कैफ त्याच्या मागे बसलेली आहे. या दोघांचा हा फोटो इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झाला आहे. तशी ही कॅटरिना कैफ आणि सलमान खानची जोडी प्रेक्षकांच्या नेहमीच पसंतीस उतरली आहे. याआधी ही मैंने प्यार किया, पार्टनर आणि एक था टायगर यासारखे हिट चित्रपट या जोडीने दिले आहेत. सलमानसोबत झालेल्या ब्रेकअपनंतर या दोघांचा हा पहिलाच चित्रपट आहे. ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिन नेहमीच या जोडीला फॅन्सचे प्रेम मिळाले आहे. त्यामुळे टायगर अभी जिंदा है मध्ये दोघांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री बघण्यास सगळेच आतुर असतील. कॅटरिनाचा 'टायगर जिंदा है' शिवाय 'जग्गा जासूस' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात तिच्यासोबत रणबीर कपूर ही दिसणार आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे यात एक नाही दोन नाही तर तब्बल 29 गाणी आहेत.  

Web Title: Salman Khan's lasting moments with Katrina Kaif enjoy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.