​सलमान खानची पहिली कमाई ही लाखो किंवा करोडोमध्ये नव्हे तर केवळ काही रुपयांत होती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 10:29 IST2017-09-28T04:59:22+5:302017-09-28T10:29:22+5:30

सलमान खान आज बॉलिवूडमधील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. फोर्बसच्या यादीतही सर्वात जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये त्याचे ...

Salman Khan's first earning was not in lakhs or crores but only in some rupees | ​सलमान खानची पहिली कमाई ही लाखो किंवा करोडोमध्ये नव्हे तर केवळ काही रुपयांत होती

​सलमान खानची पहिली कमाई ही लाखो किंवा करोडोमध्ये नव्हे तर केवळ काही रुपयांत होती

मान खान आज बॉलिवूडमधील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. फोर्बसच्या यादीतही सर्वात जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये त्याचे नाव आहे. एवढेच नव्हे तर यंदाच्या बिग बॉससाठी त्याने त्याची फी वाढवल्याची चर्चा देखील आहे. छोट्या पडद्यावर आता सगळ्यात जास्त मानधन घेणारा कलाकार तो ठरला आहे. सलमान आज करोडो मध्ये कमवत असला तरी त्याची पहिली कमाई काय होती हे तुम्हाला माहीत आहे का?
सलमानची पहिली कमाई काय होती हे तुम्हाला कळल्यावर तुम्हाला नक्कीच धक्का बसणार आहे. सलमानची पहिली कमाई ही लाखो, करोडो सोडा तर काही हजारोंमध्ये देखील नव्हती. ताज हॉटेलमध्ये झालेल्या एका डान्सिंग कार्यक्रमात मुख्य कलाकारांच्या मागे नाचणाऱ्या डान्सर पैकी सलमान होता आणि त्यासाठी त्याला केवळ ७५ रुपये मिळाले होते. सलमाननेच ही गोष्ट नुकतीच सांगितली आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सलमानने म्हटले आहे की, माझा एक मित्र ताज हॉटेलमधील एका कार्यक्रमात डान्स करणार होता. त्याच्यासोबत केवळ मजा म्हणून मी तिथे गेलो होतो. त्यावेळी मला मुख्य डान्सरच्या मागे डान्स करण्याचे ७५ रुपये मिळाले होते.
सलमानची कॅम्पा कोला या सॉफ्ट ड्रिंकची जाहिरात तर तुम्हाला चांगलीच आठवत असेल या जाहिरातीसाठी त्याला केवळ ७५० रुपये मिळाले होते. ही त्याच्या आयुष्यातील दुसरी कमाई ठरली होती.
मैंने प्यार किया या चित्रपटातील सलमानची भूमिका तर आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. याच चित्रपटाने सलमानला सुपरस्टार बनवले. या चित्रपटासाठी सलमानला ३१००० रुपये देण्याचे राजेश्री प्रोडक्शनने कबूल केले होते. पण नंतर ही रक्कम वाढवून ७५००० करण्यात आली. सलमाननेच त्याच्या कमाईची ही गुपिते पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत उलगडली आहेत.
सलमानकडे आज करोडोने पैसे असले तरी त्याची पहिली कमाई आजही त्याच्या चांगलीच लक्षात आहे. आता सलमान खान बिग बॉस या कार्यक्रमात झळकणार असून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तो करणार आहे. शेजारी-शेजारी अशी बिग बॉस ११ ची थिम असून या कार्यक्रमात कोण कोण स्पर्धक झळकणार याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागलेली आहे. 

Also Read : कोणत्या सिनेमाची भाईजान सलमानला आहे प्रतीक्षा,बिग बॉसच्या घरात करणार का प्रमोशन ?

Web Title: Salman Khan's first earning was not in lakhs or crores but only in some rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.