जॅकलिन फर्नांडिस बनणार सलमान खानची डान्स टीचर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2017 16:43 IST2017-07-13T10:59:34+5:302017-07-13T16:43:38+5:30

किकनंतर पुन्हा एकदा सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस एकत्र दिसणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच सलमान आणि जॅकलिन या ...

Salman Khan's dance teacher will become Jacqueline Fernandes | जॅकलिन फर्नांडिस बनणार सलमान खानची डान्स टीचर

जॅकलिन फर्नांडिस बनणार सलमान खानची डान्स टीचर

कनंतर पुन्हा एकदा सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस एकत्र दिसणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच सलमान आणि जॅकलिन या चित्रपटाची तयारी सुरु करणार आहेत. याचित्रपटाचा निर्मिती कोरियोग्राफर रेमो डिसोझा आहे करणार आहे. यात सलमान, जॅकलिन डेजी शहासुद्धा दिसणार आहे. या चित्रपटाची कथा डान्सवर आधारित असणार आहे. बाप-मुलीच्या नात्यावर हा चित्रपट आहे. सलमान यात 13 वर्षांच्या मुलीच्या वडिलांची भूमिका साकारणार आहे.  एका डान्सर पिता आणि त्याच्या 13 वर्षीय महत्त्वकांक्षी मुलीची ही गोष्ट आहे. यात सलमानच्या डान्स टीचरच्या भूमिकेत जॅकलिन दिसणार आहे. रेमोच्या चित्रपटात काम करण्यासाठी सलमान वेगवेगळ्या प्रकारच्या डान्सचे ट्रेनिंग घेतो आहे. रेमोच्या ‘एबीसीडी’ सीरिजचा तिसरा चित्रपटाचा हा भाग असणार आहे. टायगर अभी जिंदा है चे शूटिंग संपल्यावर सलमान रेमोच्या चित्रपटाला सुरुवात करणार आहे. 
सलमान सध्या त्याच्या टायगर अभी जिंदा है च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. टायगर अभी जिंदा हा चित्रपट याच वर्षी ख्रिसमसला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात त्याच्यासह त्याची एक्स गर्लफ्रेंड कॅटरिना कैफ झळकणार आहेत. तब्बल 5 वर्षांनंतर या दोघांची जोडी मोठ्या पडद्यावर येणार आहे. हा चित्रपट एक था टायगरचा सीक्वल आहे.  प्रेक्षक त्यांच्या केमिस्ट्री बघण्यास उत्सुक असते. सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हाच्या जोडीचा दबंग 3 सुद्धा येणार आहे. सध्या या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम चालू आहे. 

Web Title: Salman Khan's dance teacher will become Jacqueline Fernandes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.