​सलमान खानचा ‘दंबग’ अवतार दिसणार वर्ल्ड टूरमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2017 20:30 IST2017-02-18T15:00:17+5:302017-02-18T20:30:17+5:30

बॉलिवूडचा ‘दंबग’ सलमान खान लवकरच एका वर्ल्ड टूरवर जाणार आहे. त्याच्या या टूरमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींचा समावेश असणार आहे. ...

Salman Khan's "Dabg" avatar will be seen in the world tour | ​सलमान खानचा ‘दंबग’ अवतार दिसणार वर्ल्ड टूरमध्ये

​सलमान खानचा ‘दंबग’ अवतार दिसणार वर्ल्ड टूरमध्ये

लिवूडचा ‘दंबग’ सलमान खान लवकरच एका वर्ल्ड टूरवर जाणार आहे. त्याच्या या टूरमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींचा समावेश असणार आहे. अभिनेता मनीष पॉल याने या वर्ल्ड टूरचा खुलासा केला आहे. मनीष पॉल म्हणाला, ‘सलमान खानसोबत ‘दंबग द टूर’मध्ये सादरीकरण करणे हा माझ्यासाठी सर्वांत चांगला अनुभव असेल.’ 

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार ‘तेरे बिन लादेन २’चा अभिनेता मनीष पॉल सलमान सोबत वर्ल्ड टूरवर जाण्यासाठी उत्सुक असून त्याने याची तयारी सुरू केली आहे. टीव्ही अभिनेता व निवेदक म्हणून ख्यात असलेला मनीष पॉल अभिनेता सलमानच्या ‘दंबग’ वर्ल्ड टूरमध्ये कार्यक्रमाचे संचालन व विविध कार्यक्रमाचे सादरीकरण करणार आहे. सलमान खानच्या ‘दबंग द टूर’चे आयोजन ‘द चॉकलेट रूम’या एजेन्सीने केले आहे. 

अभिनेता मनीष पॉल म्हणाला, सलमान खानच्या ‘वर्ल्ड टूर’चा मला एक भाग होता आले याचा मला आनंद आहे. हा माझा पहिला वर्ल्ड टूर आहे, सलमान खान, प्रभूदेवा, बिपाशा बसू, डेझी शाह यासारख्या कलावंतांसोबत सादरीकरण करणे हा उत्कृष्ठ अनुभव असेल. मी या टूरसाठी उत्सुक असून केवळ निवेदन नव्हे तर काहीतरी वेगळे करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. हा वर्ल्डटूर माझ्यासाठी शानदार असेल. 



‘दंबग द टूर’साठी यात सहभागी होणारे सर्व कलावंत तयारीला लागले आहेत. सलमान खानदेखील याची विशेष तयारी करीत आहे. या वर्ल्ड टूरमध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा व रॅपर बादशाह यांचा देखील समावेश असेल. ‘दंबग द टूर’ हांगकाँग, आॅकलँड, सिडनी, मेलबर्न येथे सादरीकरण करणार असल्याची सांगण्यात येत आहे. 

सोनाक्षी सिन्हा सध्या आपल्या आगामी ‘नूर’ व ‘बाहुबली’ची अभिनेत्री तमन्ना भाटिया या दोन अभिनेत्री आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये व्यस्त असल्याने त्या ‘दंबग द टूर’च्या तयारीत सहभागी होऊ शकल्या नाहीत. मात्र या दोघीही कुठेतरी या टूरला ज्वार्इंट करतील असे सांगण्यात येत आहे. 


Web Title: Salman Khan's "Dabg" avatar will be seen in the world tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.