सलमान खानच्या 'दबंग3' मध्ये मलायका अरोराचा दिसणार जलवा ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2017 16:41 IST2017-08-08T10:30:27+5:302017-08-08T16:41:52+5:30
गेल्या अनेक दिवसांपासून सलमान खानचा 'दबंग 3' चित्रपट वेगवेगळ्या कारणांना घेऊन चर्चेत आहे. सल्लू मियाँचे फॅन्स या चित्रपटाची आतुरतेने ...
.jpg)
सलमान खानच्या 'दबंग3' मध्ये मलायका अरोराचा दिसणार जलवा ?
ग ल्या अनेक दिवसांपासून सलमान खानचा 'दबंग 3' चित्रपट वेगवेगळ्या कारणांना घेऊन चर्चेत आहे. सल्लू मियाँचे फॅन्स या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. लवकरात लवकर हा चित्रपट प्रदर्शित व्हावा अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे. मात्र चित्रपटाचा निर्माता असलेल्या अरबाज खानने दबंग 3च्या स्क्रिप्टवर अजून काम चालू असल्याचे सांगितले होते. जसे स्क्रिप्टचे काम संपले तसा चित्रपट फ्लोअरवर येईल. दबंग चित्रपटाची सीरिज आठवली की प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर येतात ते सलमान खान, सोनाक्षी सिन्हा आणि अरबाज खान. या तिघांशिवाय आणखीन एका असा चेहरा आहे ज्यांच्या शिवाय दबंगची टीम पूर्ण होऊ शकत नाही. ते नाव आहे मलायका अरोरा हिचे. मलायकाने आधीच्या दोन्ही चित्रपटात जबरदस्त आयटम साँग केले आहेत. अरबाज आणि मलायका यांचा घटस्फोट झाल्यानंतर मलायका या चित्रपटाचा भाग असेल किंवा नाही नसेल असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
ALSO READ : मलायका अरोरा म्हणते, अरबाज आजही माझ्या आयुष्याचा भाग!
याबाबतचा खुलासा मलायका अरोरानेच केला आहे. ''जर मला दबंग 3 चित्रपटात काम करण्याची ऑफर आली तर मी याचित्रपटाचा भाग नक्कीच बनेन. दबंगच्या सीरिजमध्ये काम करण्याचा अनुभव नेहमीच चांगला राहिला आहे.'' पुढे मलायकाला अरबाज खानच्या पुढच्या प्रोजेक्ट्सचा तू हिस्सा बनणार का असा प्रश्न विचाराण्यात आला यावेळी ती म्हणाली, ''हा प्रश्न तुम्ही अरबाजला जाऊन विचारा कि तो मला त्याच्या पुढच्या प्रोजेक्ट्सचा हिस्सा बनवणार आहे का ? जोपर्यंत माझा विषय आहे मला नेहमीच आवडते त्याच्यासोबत काम करायला. मी त्याचे फ्यूचर प्लॉन्स जाणून घेण्याबद्दल उत्सुक आहे. मला वाटते सध्या तो 'दबंग3' वर काम करतो आहे.''