सलमान खानचे करिअर चमकविणाऱ्या महेश बाबूच्या आगामी चित्रपटाचा पाहा फर्स्ट लूक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2018 15:33 IST2018-01-27T10:00:29+5:302018-01-27T15:33:46+5:30

बॉलिवूडचा सुलतान सलमान खान याचा २००९ मध्ये आलेल्या ‘वॉन्टेड’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर जबरदस्त कमाई केली होती. विशेष म्हणजे ...

Salman Khan's career shines with Mahesh Babu's upcoming film First Look! | सलमान खानचे करिअर चमकविणाऱ्या महेश बाबूच्या आगामी चित्रपटाचा पाहा फर्स्ट लूक!

सलमान खानचे करिअर चमकविणाऱ्या महेश बाबूच्या आगामी चित्रपटाचा पाहा फर्स्ट लूक!

लिवूडचा सुलतान सलमान खान याचा २००९ मध्ये आलेल्या ‘वॉन्टेड’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर जबरदस्त कमाई केली होती. विशेष म्हणजे सलमानच्या करिअरला या चित्रपटाने एक मोठा ब्रेक मिळवून दिला. पुढे या अ‍ॅक्शन चित्रपटानंतर सलमानने असा काही वेग धरला ज्याला थांबविणे आता अवघड झाले आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे काय की, सलमानचा हा चित्रपट तेलगू सुपरस्टार महेश बाबू याच्या एका चित्रपटावर आधारित आहे. होय, २००६ मध्ये आलेल्या ‘पोकिरी’ या सुपरहिट चित्रपटाचाच ‘वॉन्टेड’ रिमेक आहे. महेश बाबूने ‘पोकिरी’मध्ये ज्या पद्धतीने भूमिका साकारली अगदी तशीच कॉपी सलमानने ‘वॉन्टेड’मध्ये केली. असो, आता महेश बाबू यांच्या आगामी चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, त्याचा फर्स्ट लूक समोर आला आहे. ‘भारत आने नेनु’ असे नाव असलेल्या या चित्रपटात महेश बाबू खूपच डॅशिंग भूमिकेत दिसणार असून, त्याची झलक या चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये बघावयास मिळते. सध्या त्याच्या या चित्रपटाचा फर्स्ट लूक व्हायरल होत आहे. 
 }}}} ">Bharath takes office :)#BharathAneNenupic.twitter.com/4TNVHp6ZyV— Mahesh Babu (@urstrulyMahesh) January 26, 2018
महेश बाबूने वयाच्या चार वर्षांपासूनच अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. सध्या महेश बाबू साउथ इंडस्ट्रीमधील सर्वाधिक पॉप्युलर स्टार्सपैकी एक आहे. कमाईच्या बाबतीत तर महेश बाबु चक्क सुपरस्टार रजनीकांत यांना टक्कर देतो. कारण ‘स्पायडर’ या चित्रपटात त्याने चक्क २५ कोटी रुपये फिस आकारली होती. महेश बाबूने अभिनेत्री नम्रता शिरोडकर हिच्याशी विवाह केला. महेश बाबूला प्रिन्स आॅफ टॉलीवूड असेही म्हटले जाते. महेश बाबू साउथ इंडस्ट्रीबरोबरच बॉलिवूडमध्येही प्रचंड लोकप्रिय आहे. 

Web Title: Salman Khan's career shines with Mahesh Babu's upcoming film First Look!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.