सलमान खानची सायकल तुम्हाला १० जुलैला खरेदी करता येईल; कशी व कुठे हे जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2017 19:47 IST2017-07-09T14:17:08+5:302017-07-09T19:47:08+5:30

बºयाचशा ब्रॅण्डचा प्रचार केल्यानंतर बॉलिवूडचा दबंग सलमान खान आता त्याच्याच ब्रॅण्डची ई-सायकल येत्या १० जुलै रोजी लॉन्च करणार आहे. ...

Salman Khan's bike can be bought on July 10; Read on to know how and where it is detailed !! | सलमान खानची सायकल तुम्हाला १० जुलैला खरेदी करता येईल; कशी व कुठे हे जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर!!

सलमान खानची सायकल तुम्हाला १० जुलैला खरेदी करता येईल; कशी व कुठे हे जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर!!

याचशा ब्रॅण्डचा प्रचार केल्यानंतर बॉलिवूडचा दबंग सलमान खान आता त्याच्याच ब्रॅण्डची ई-सायकल येत्या १० जुलै रोजी लॉन्च करणार आहे. सलमानची ही ई-सायकल येत्या १० जुलैपासून बाजारात मिळणार आहे. एका जवळच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, सलमानने स्वत: या सायकलचे डिझाइन केले असून, ते लोकांना नक्कीच आवडणार आहे. दरम्यान, या सायकलचे डिझाइन करताना एका गोष्टीची विशेष काळजी घेण्यात आली आहे. ती म्हणजे सायकल आरामदायी आहेच, शिवाय लाभदायीदेखील आहे.

ही सायकल सलमान खानप्रमाणेच फिट, स्टायलिश, कूल आणि नव्या दमाची आहे. सायकल बघितल्यानंतरच ती ग्राहकांना पसंत पडेल यात शंका नाही. सूत्राने सांगितले की, सध्या बीएच१२ आणि बीएच२७ असे दोन मॉडेल बाजारात उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या दोन्ही प्रकारच्या सायकलींमध्ये पायडल असिस्ट आणि रीचार्जेबल बॅटरीज बसविण्यात आल्या आहेत. ज्यामुळे सायकलिंग करणाºयास आराम आणि वेगळ्या अनुभव देईल. या दोन्ही प्रकारची सायकली २५ किमी प्रति तास या वेगाने धावणार आहेत. 

सलमान त्याच्या या सायकलचा प्रचार करण्यासाठी काही दिवसांपूर्वी बांद्रा भागात सायकल चालविताना बघावयास मिळाला होता. त्यावेळी त्याने म्हटले होते की, ‘आजही सायकलचेच युग आहे. सायकल चालविल्यास प्रकृती ठणठणीत राहते.’ असो, सलमानच्या या सायकलचे वैशिष्ट्ये म्हणजे, सायकलमध्ये बॅटरी असून, तिला चार्ज करणे सहज शक्य आहे. जर तुम्ही सायकलचे पायडल मारले नाही तरीदेखील सायकल रस्त्यावर धावणार आहे. सायकलच्या इतर फिचर्सविषयी सांगायचे झाल्यास, ‘बीएच१२ आणि बीएच२७’ प्रिमियम क्वालिटी आणि हलक्या वजनाच्या स्टील फ्रेमने बनविण्यात आली आहे. सायकलच्या चाकांमध्ये मेकॅनिकल डिस्क ब्रेक बसविण्यात आले आहेत. हे ब्रेक सायकलच्या वेगानुसार अ‍ॅडजेस्ट करता येतात. या व्यतिरिक्त या सायकलमध्ये ब्राइट एलइडी लाइटही बसविण्यात आली आहे. 

सायकलच्या किमतीविषयी सांगायचे झाल्यास, बीएच१२ मॉडलची सायकल ४० हजार ३२३ रुपयांपर्यंत असेल. तर बीएच२७ मॉडलची सायकल ५७ हजार ५७७ रुपयांपर्यंत खरेदी करता येईल. आता सलमानच्या या सायकलला बाजारात कितपत प्रतिसाद मिळतो हे येत्या काळात स्पष्ट होईलच. 

Web Title: Salman Khan's bike can be bought on July 10; Read on to know how and where it is detailed !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.