स्टारडम धोक्यात पाहून सलमान खान झाला ‘अलर्ट’! जावयाच्या चित्रपटाला कळवला नकार!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 15:56 IST2017-09-26T10:26:30+5:302017-09-26T15:56:30+5:30
‘ट्यूबलाईट’ फ्लॉप झाल्यावर सलमान खान आताश: ताक सुद्धा फुंकून पितोय. आपले स्टारडम धोक्यात आहे, कदाचित याची भणक त्याला लागली ...

स्टारडम धोक्यात पाहून सलमान खान झाला ‘अलर्ट’! जावयाच्या चित्रपटाला कळवला नकार!!
‘ ्यूबलाईट’ फ्लॉप झाल्यावर सलमान खान आताश: ताक सुद्धा फुंकून पितोय. आपले स्टारडम धोक्यात आहे, कदाचित याची भणक त्याला लागली असावी.‘ट्यूबलाईट’कडून सलमानचं नाही तर त्याच्या चाहत्यांनाही प्रचंड अपेक्षा होत्या. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्येही कुठलीच कसर सोडली गेली नव्हती. पण तरिही हा चित्रपट दणकून आपटला अन् सलमान व त्याच्या चाहत्यांच्या अपेक्षांना सुरूंग लागला. ही वेळ होती, अलर्ट होण्याची. यापुढे चित्रपटांची निवड अगदी विचारपूर्वक करायची, हे ठरवण्याची. सलमानने ही वेळ अगदी अचूक हेरली आणि तो अलर्ट झाला. ताजी बातमी त्याचा पुरावा म्हणायला हवी.
![]()
होय, सलमानने म्हणे त्याचा जावई (बहीण अलवीरा हिचा पती) अतुल अग्निहोत्री याच्या चित्रपटाला नकार दिला आहे. अतुल अग्निहोत्रीला ‘बॉडीगार्ड’चा सीक्चल बनवायचा आहे आणि यासाठी सलमान ही त्याची पहिली पसंत आहे. पण वेळ नसल्याचा बहाना सांगून सलमानने या चित्रपटाला नकार कळवला असल्याचे कळतेय. ‘बॉडीगार्ड’मध्ये सलमान व करिना कपूर मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट हिट झाला होता. लवकरच याच्या सीक्वलवर काम सुरु होत आहे.
ALSO READ : पहाटे चारवाजेपर्यंत रंगली संजय दत्त अन् सलमान खानची ‘सीक्रेट मीटिंग’! वाचा सविस्तर!!
अतुल अग्निहोत्रीप्रमाणेच सलमानने सख्खा भाऊ अरबाज खान यालाही अधांतरी ठेवले आहे. अरबाजला ‘दबंग3’ करायचा आहे. यात त्याला सलमानच हवा आहे. पण सलमानला ‘दबंग3’ची स्क्रिप्ट आवडली नाही आणि त्यामुळे या चित्रपटाचे शूटींग रखडले. आधी स्क्रिप्ट चांगली कर आणि मग कामाचे बोल, असे सलमानने म्हणे अरबाजला स्पष्ट शब्दांत सुनावले. एकंदर काय तर स्टारडम टिकवायचे असेल तर काही कठोर निर्णय घ्यावेच लागणार, हे सलमानने ओळखले आहे. बॉक्सआॅफिसवर चालतील असेच चित्रपट आधी करायचे आणि मग यातून वेळ मिळाला तर कुटुंबातील सदस्यांच्या प्रस्तावावर विचार करायचा, असे सलमानने ठरवलेले दिसते. तूर्तास सलमान त्याच्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तो कॅटरिना कैफसोबत दिसणार आहे. येत्या २२ डिसेंबरला हा चित्रपट रिलीज होत आहे.