सलमान खान 'ह्या' कारणामुळे आहे चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 11:34 IST2018-10-27T11:32:41+5:302018-10-27T11:34:30+5:30

बॉलिवूडचा दंबग खान सलमान व बार्बी गर्ल म्हणजेच अभिनेत्री कतरिना कैफ ही जोडी पुन्हा एकदा 'भारत' चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

Salman Khan is worried because of this 'cause' | सलमान खान 'ह्या' कारणामुळे आहे चिंतेत

सलमान खान 'ह्या' कारणामुळे आहे चिंतेत

ठळक मुद्दे'भारत' चित्रपटाचा बराचसा भाग 'माल्टा'मध्ये झाला चित्रीतसलमान खान व कतरिना कैफ पुन्हा एकत्र दिसणार 'भारत' चित्रपटात

बॉलिवूडचा दंबग खान सलमान व बार्बी गर्ल म्हणजेच अभिनेत्री कतरिना कैफ ही जोडी पुन्हा एकदा 'भारत' चित्रपटात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या दोघांचे चाहते या सिनेमाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असले तरी सलमान या चित्रपटामुळे सध्या चिंतेत आहे. त्याच्या या चिंतेचे कारण आहे या चित्रपटाची वाढती लांबी.

'भारत' चित्रपट तीन तासांहून अधिक लांबीचा होणार असल्याचे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांना वाटते. मात्र, हा चित्रपट पावणे तीन तासांच्या आत बनवला जावा अशी सलमानची इच्छा आहे. त्यात अली अब्बास जफर मात्र कुठल्याही स्थितीत चित्रपटाच्या कथेबद्दल तडजोड करायला तयार नाहीत. चित्रपटाची लांबी वाढेल, या चिंतेत कोणतीही काटछाट करायला ते तयार नाहीत. आता सलमान आणि अली अब्बास याबद्दल काय निर्णय घेणार हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. 
'भारत' चित्रपटाचा बराचसा भाग 'माल्टा' या सुंदर ठिकाणी चित्रीत करण्यात आला आहे. तर 'अबूधाबी' येथेही या चित्रपटाचे शूटिंग करण्यात आले. अली अब्बास जफरचा 'भारत' हा सलमानसोबतचा तिसरा चित्रपट आहे. यापूर्वी त्यांचे 'सुलतान' व 'टायगर जिंदा है' हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले आहेत. 'भारत' या चित्रपटात कॅटरिनाशिवाय तब्बू आणि दिशा पटानी या अभिनेत्रीदेखील झळकणार आहेत. हा चित्रपट पुढच्या वर्षी ५ जूनला प्रदर्शित होणार आहे. 
 

Web Title: Salman Khan is worried because of this 'cause'