गुड न्यूज! लग्नाआधीच आता सलमान खानच्या घरीही हलणार पाळणा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 10:22 IST2019-05-10T10:19:15+5:302019-05-10T10:22:27+5:30

शाहरुख खान, करण जोहर, तुषार कपूर, एकता कपूर आणि सनी लिओनी हे बी-टाऊनमधले कलाकार सरोगसीच्या मदतीने आई-वडील झाले आहेत.

Salman khan will be a father before marriage | गुड न्यूज! लग्नाआधीच आता सलमान खानच्या घरीही हलणार पाळणा?

गुड न्यूज! लग्नाआधीच आता सलमान खानच्या घरीही हलणार पाळणा?

ठळक मुद्दे रिपोर्टनुसार सलमान खानदेखील सरोगसीच्या मदतीने बाबा होणार आहे सलमान खानचा भारत सिनेमा ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

शाहरुख खान, करण जोहर, तुषार कपूर, एकता कपूर आणि सनी लिओनी हे बी-टाऊनमधले कलाकार सरोगसीच्या मदतीने आई-वडील झाले आहेत. या लिस्टमध्ये आता आणखी एक नाव सामील होणार आहे. स्पॉटबायच्या रिपोर्टनुसार भाईजान अर्थात सलमान खानचे नावदेखील यात सामील होणार आहे. रिपोर्टनुसार सलमान खानदेखील सरोगसीच्या मदतीने बाबा होणार आहे. 


आता पर्यंत सलमानचे फॅन्स त्याला लग्न कधी करणार हा एकच प्रश्न विचारायचे ज्याचे उत्तर सलमानकडे देखील नव्हते. मात्र आता सलमान लग्न न करताच पिता होणार असल्याच्या माहितीमुळे सगळ्यांच धक्का बसला आहे. स्पॉटबायच्या माहतीनुसा, सलमान सध्या लग्नासाठी तयार नाहीय. मात्र तो सरोगसी पद्धतीचा अवलंब करत वडील होणार आहे. सलमानला लहान मुलं आधीपासून खूप आवडतात. अशात त्याच्या घरीच लहान पाहुण्याच्या स्वागताची तयारी सुरु झाली आहे.   

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर, सलमान खानचा भारत सिनेमा ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमान खानसोबत यात कतरिना कैफ, जॅकी श्रॉफ, नोरा फतेही, सुनील ग्रोव्हर, तब्बू, दिशा पाटनी असे अनेक कलाकार आहेत. हा सिनेमा हिंदीशिवाय, तमिळ, तेलगू आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे. सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा अली अब्बास जाफरने सांभाळली आहे. भारत सिनेमात अ‍ॅक्शन, रोमान्स आणि देशभक्ती पाहायला मिळणार आहे आणि चार टप्प्यात या सिनेमाची कथा उलगडण्यात येणार आहे.
 

Web Title: Salman khan will be a father before marriage