सलमान खान दिसणार 'टायगर'नंतर 'या' चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2017 16:16 IST2017-03-03T10:46:58+5:302017-03-03T16:16:58+5:30

सलमान खान लवकरच तिचा आगामी 'टायगर जिंदा है' या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. यानंतर सलमान काहीकाळ अॅक्शन मधून ...

Salman Khan will appear before 'Tiger' in the film | सलमान खान दिसणार 'टायगर'नंतर 'या' चित्रपटात

सलमान खान दिसणार 'टायगर'नंतर 'या' चित्रपटात

मान खान लवकरच तिचा आगामी 'टायगर जिंदा है' या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. यानंतर सलमान काहीकाळ अॅक्शन मधून आराम घेऊन डान्समध्ये आपला जलवा दाखवणार आहे.  
गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती की सलमान टायगरच्या सिक्वलनंतर सोहेल खानच्या 'शेर खान'च्या शूटिंगला लागणार आहे. मात्र स्वत:सोहेल खानने सलमान या चित्रपटाचा भाग नसल्याचे सांगितले आहे. टायगरनंतर सलमान खान रेमो डिसूजाकडून डान्सचे धडे घेणार आहे. रेमोकडून डान्स शिकायचे कारण म्हणजे सलमान खान पहिल्यांदा आपल्याला डान्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. सलमान डान्सरची भूमिका साकारण्याच्या आधी स्वत:ला त्या भूमिकेसाठी तयार करताना दिसतोय. यासाठी सलमान रोमोकडून डान्सची ट्रेनिंग घेणार आहे. 

रोमोने सलमानच्या भूमिकेवर विशेष मेहनत घेत असल्याचे समजते आहे. सलमानसाठी एक वेगळा डान्स फॉर्म रोमो तयार करतोय. ज्यात रोमो वेगवेगळे एक्सपेरिमेंट करत असल्याचे समजते आहे. या चित्रपटाची कथा डान्स ड्रामावर आधारित आहे. रोमो डिसूजा स्वत: या चित्रपटाचे दिग्दर्शन करतोय. सलमान यात 13 वर्षांच्या मुलीच्या वडिलांची भूमिका साकारणार असल्याचे सूत्रांकडून कळतेय. 

सलमान रेमोच्या या चित्रपटाबाबत उत्साहित आहे. याआधी सलमानने चित्रपटात केलेल्या अनेक डान्स स्पेट्स हिट झाल्या आहेत. मात्र असे असूनही सलमानने अजूनपर्यंत कधी चित्रपटात डान्सरची भूमिका साकारली नाही आहे. त्यामुळे सलमानच्या चाहत्यांना त्याला या भूमिकेत बघण्याची उत्सुकता असेल याबाबत काहीही शंका नाही. मात्र सलमानला या भूमिकेत बघण्यासाठी त्याच्या फॅन्सला अजून खूप वाट पहावी लागणार आहे.  सलमान अली अब्बास जाफरच्या दिग्दर्शित टायगरच्या सिक्वलच्या शूटिंगला अजून सुरुवात ही झाली नाही आहे. यात चित्रपटात आपल्याला सलमासह अभिनेत्री कतरिना कैफ ही दिसणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगनंतर सलमान रेमोकडून डान्सची ट्रेनिंग घेणार आणि त्यानंतर चित्रपटाची शूटिंगला सुरुवात होणार.   

Web Title: Salman Khan will appear before 'Tiger' in the film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.