"कॉलेजमध्ये भाईजान बिकीनी परिधान करुन पळाला अन्..."; सलमान खानच्या आयुष्यातील अजब किस्सा

By देवेंद्र जाधव | Updated: March 7, 2025 18:13 IST2025-03-07T18:12:35+5:302025-03-07T18:13:20+5:30

भाईजान सलमान उत्साहाने या सीनचं शूटिंग करायला तयार झाला. पण नंतर त्याचीच फजिती झाली (salman khan)

salman khan wear bikini in wilson college at shooting of baaghi movie | "कॉलेजमध्ये भाईजान बिकीनी परिधान करुन पळाला अन्..."; सलमान खानच्या आयुष्यातील अजब किस्सा

"कॉलेजमध्ये भाईजान बिकीनी परिधान करुन पळाला अन्..."; सलमान खानच्या आयुष्यातील अजब किस्सा

सलमान खान (salman khan) हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. सलमानला आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. सलमानने कधी त्याचे सिक्स पॅक दाखवत आदर्श नायक कसा असतो, याचं उदाहरण सर्वांसमोर आणलं. तर दुसरीकडे सलमानने 'पार्टनर', 'रेडी' यांसारख्या सिनेमांमध्ये कॉमेडी भूमिकाही साकारल्या. याशिवाय 'दबंग', 'गर्व', 'बागी' या सिनेमांमध्ये सलमानने दे मार अॅक्शन केली. अशातच सलमानने एका मुलाखतीत 'बागी' सिनेमातील किस्सा सांगितला. 'बागी'मधील एक सीन शूट करताना सलमान शरमेने लाल पडला होता.

सलमानचा बिकीनी सीन अन्...

'बागी' सिनेमात सलमानचा एक बिकीनी सीन शूट होणार होता. सलमान हा सीन शूट करण्यासाठी खूप उत्सुक होता. परंतु नंतर मात्र चित्र बदललं. कारण मुंबईतील विल्सन महाविद्यालयात या सिनेमाचं शूटिंग सुरु झालं. अशातच कॉलेजला लागून असलेल्या गिरगाव चौपटीजवळील लोकांना या शूटिंगची खबर लागली. मग काय हजारोंचा जथ्था विल्सन कॉलेजजवळ पोहोचला. आता इतक्या लोकांसमोर बिकीनी परिधान करुन शूटिंग करायची सलमानला लाज वाटू लागली.

"एक बार मैने कमिटमेंट कर दी तो मैं अपने आप की भी नही सुनता", हा सलमानचा 'वॉन्टेड' सिनेमातील डायलॉग सर्वांना माहितच आहे. रिअल लाईफमध्येही सलमानने या संवादाचा वापर केला. कितीही लाज वाटली तरीही सलमानने 'बागी'मधील बिकीनी सीनचं शूटिंग पूर्ण केलं. सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर भाईजानचा 'सिकंदर' सिनेमा ईदच्या मुहुर्तावर अर्थात २८ मार्चला रिलीज होणार आहे. सर्वांना 'सिकंदर'ची उत्सुकता आहे.

Web Title: salman khan wear bikini in wilson college at shooting of baaghi movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.