सलमानच्या मनातील राणी तिसरीच; ऐश्वर्या, कतरिना नव्हे तर या अभिनेत्रीसोबत करायचं होतं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 15:46 IST2023-02-01T15:43:53+5:302023-02-01T15:46:38+5:30

एकेकाळी सलमान या अभिनेत्रीवर इतका फिदा होता की, त्याने तिच्या वडीलांकडे लग्नाची मागणी घातली होती, पण...

Salman khan wanted to marry Juhi chawla actress father rejected the actors proposal | सलमानच्या मनातील राणी तिसरीच; ऐश्वर्या, कतरिना नव्हे तर या अभिनेत्रीसोबत करायचं होतं लग्न

सलमानच्या मनातील राणी तिसरीच; ऐश्वर्या, कतरिना नव्हे तर या अभिनेत्रीसोबत करायचं होतं लग्न

सलमान खान (Salman Khan) आपल्या लव्ह लाईफमुळे नेहमीच चर्चेत असतो. या अभिनेत्याचे नाव अनेक बॉलिवूड अभिनेत्रींशी आतापर्यंत जोडले गेले आहे. सलमान खानच्या आयुष्यात अनेक अभिनेत्री आल्या आणि गेल्या पण एका अभिनेत्रीसोबत हे प्रकरण लग्नापर्यंत पोहोचले होते. आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत ती संगीता बिजलानी आहे हे तुम्हाला समजले असेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, संगीता बिजलानी आणि सलमान खान यांच्या लग्नाची पत्रिकाही छापण्यात आली होती, मात्र शेवटच्या क्षणी दोघांनी लग्नाला नकार दिला.

संगीता नंतर, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ आणि इतर अनेक अभिनेत्री सलमान खानच्या आयुष्यात आल्या, पण तुम्हाला माहित आहे का की सलमान खानला तिच्यासोबत यापैकी कोणासोबत नाही तर दुसऱ्या एका  अभिनेत्रीसोबत लग्न करायचे होते. लग्नाची बोलणी करण्यासाठी सलमान खान या अभिनेत्रीच्या घरी पोहोचला होता. 

सलमान खानला ज्या अभिनेत्रीसोबत लग्न करायचे होते ती कोण होती हे जाणून घेणे तुम्हाला खूप उत्सुकता असेल.  आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत ती दुसरी तिसरी कोणी नसून जुही चावला आहे. इतक्या वर्षांनंतरही या अभिनेत्रीची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. एकेकाळी सलमान जुहीवर फिदा होता. इतका की, त्याने तिच्या वडीलांकडे लग्नाची मागणी घातली होती. सलमान जुहीच्या वडिलांकडे गेला आणि त्याने थेट जुहीसोबत लग्नाची इच्छा व्यक्त केली. 

‘जुही खूप गोड आणि प्रेमळ आहे. मी तिच्या वडिलांनाही जुहीसोबत मी लग्न करू शकतो का? असं विचारलं होतं. पण तिच्या वडिलांनी मला नकार दिला. कदाचित मी त्यांना आवडलो नसेल. त्यांना काय हवं होतं, माहित नाही?,’ असं सलमान या मुलाखतीत म्हणाला होता. 

1995 साली जुहीने बिझनेसमॅन जय मेहतासोबत लग्न केले. ही लव्हस्टोरी कशी सुरु झाली होती, याचाही खुलासा तिने केला होता. तिने सांगितलं होतं, ‘बॉलिवूड डेब्यूआधीच एकदा जयसोबत भेट झाली होती. पण ही भेट खूपच छोटी होती. चित्रपटात काम करायला लागल्यानंतर जयसोबत कुठलाही संपर्क नव्हता. पण काही वर्षांनंतर एका मित्राच्या डिनर पार्टीत आम्ही पुन्हा भेटलो आणि आमच्यात मैत्री झाली. 

यानंतर मी जिथे असेल तिथे जय हजर असायचा. मी एखाद्या ठिकाणी पोहोचले की तो फुलांचा गुच्छ आणि गिफ्ट घेऊन आधीच पोहोचलेला असायचा. माझ्या एका वाढदिवसाला त्याने मला ट्रकभर गुलाबांची फुलं पाठवली होती. यानंतर वर्षभराने त्याने मला प्रपोज केलं होतं.’

Web Title: Salman khan wanted to marry Juhi chawla actress father rejected the actors proposal