Aryan Khan Drugs Case: आर्यन खानच्या जामीनावरील सुनावणी टळली, सलमान पुन्हा पोहोचला 'मन्नत'वर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 18:59 IST2021-10-13T18:58:47+5:302021-10-13T18:59:11+5:30
Aryan Khan Drugs Case: बॉलीवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) काही वेळापूर्वी अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याच्या मुंबईतील 'मन्नत' या निवासस्थानी पोहोचला आहे.

Aryan Khan Drugs Case: आर्यन खानच्या जामीनावरील सुनावणी टळली, सलमान पुन्हा पोहोचला 'मन्नत'वर
Aryan Khan Drugs Case: बॉलीवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) काही वेळापूर्वी अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याच्या मुंबईतील 'मन्नत' या निवासस्थानी पोहोचला आहे. आर्यन खान याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. पण जामीन अर्जावर आज सुनावणी पूर्ण होऊ शकली नाही. उद्या सकाळी ११ वाजता पुन्हा एकदा सुनावणीला सुरुवात होणार आहे. आजची सुनावणी तहकूब झाल्याची माहिती समोर आल्यानंतर 'मन्नत'वर शाहरुखला पाठिंबा देण्यासाठी सलमान पोहोचला आहे.
आर्यन खानच्या कोर्ट प्रकरणांमध्ये आजवर एकदाही शाहरुख कोर्टात उपस्थित राहिलेला नाही. शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी आणि त्याचा सुरक्षा रक्षकच कोर्टाच्या सुनावणीला हजर राहून सर्व माहिती शाहरुखपर्यंत पोहोचवत आले आहेत. काल सलमान खान त्याचे वडील सलीम खान यांना घेऊन 'मन्नत'वर शाहरुखच्या भेटीसाठी पोहोचला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा सलमान 'मन्नत'वर पोहोचला आहे. याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. आर्यन खान याला एनसीबीनं ताब्यात घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर ३ ऑक्टोबर रोजी सलमान 'मन्नत'वर पोहोचला होता. या संपूर्ण प्रकरणात शाहरुखला सर्वात आधी सलमाननं पाठिंबा दिला होता आणि तो थेट 'मन्नत'वर पोहोचलेला पाहायला मिळाला होता.