Salman Khan Video: सलमान खानने केली चाहत्याची 'चप्पी', पैसेही मागितले; Video व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 12:48 IST2022-04-14T12:46:53+5:302022-04-14T12:48:04+5:30

Salman Khan Video: सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय, ज्यात सलमान खान त्याच्या चाहत्याचे कास कापताना दिसतोय.

Salman Khan Viral Video: Salman Khan cut his fans hair and asked for money ; Video Viral | Salman Khan Video: सलमान खानने केली चाहत्याची 'चप्पी', पैसेही मागितले; Video व्हायरल...

Salman Khan Video: सलमान खानने केली चाहत्याची 'चप्पी', पैसेही मागितले; Video व्हायरल...

मुंबई: चाहते आपल्या आवडत्या अभिनेत्यासाठी कीहीही करायला तयार होतात. अनेकदा अभिनेतेही त्यांच्या चाहत्यांसाठी त्यांच्या आवडीच्या गोष्टी करताना दिसतात. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानही (Salman Khan) यात कमी नाही. तो अनेकदा आपल्या चाहत्यांच्या इच्छा पूर्ण करताना दिसतो. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात सलमान खान त्याच्या एका चाहत्याचे केस कापताना दिसतोय.

सलमानने केली चाहत्याची चप्पी
सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सलमान खान त्याच्या चाहत्याचे केस कापण्यासाठी आल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसल्याप्रमाणे सलमान आपल्या चाहत्याची अर्धी चप्पी करतो आणि 'तेरे नाम' स्टाईलने भांग पाडतो. विशेष म्हणजे, हा सगळा प्रकार शेकडो लोकांसमोर होत असतो. 

पाहा व्हिडिओ:-

व्हिडिओवर विविध प्रतिक्रिया 
हा व्हिडीओ इथेच संपत नाही, तर केस कापल्यानंतर सलमान त्या व्यक्तीकडून आपल्या कामाचे पैसे मागतो. तो चाहताही खिशातून 100 रुपयांची नोट काढून देतो. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर चाहत्यांच्या विविध कमेंट्स येत आहेत. दरम्यान, सलमान सध्या त्याच्या आगामी टायगर 3 या चित्रपटाचे शूटींग करत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कतरिना कैफ दिसणार आहे. 

Web Title: Salman Khan Viral Video: Salman Khan cut his fans hair and asked for money ; Video Viral