बॉबी देओलला सुपरस्टार बनवण्याच्या तयारीत लागला सलमान खान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2018 10:46 IST2018-03-24T05:16:10+5:302018-03-24T10:46:10+5:30
सलमानने जिसके सर पर हाथ रखा उसकी तकदीर बदलते देर नही लगती असेच काहीसे म्हणावे लागले बॉबी देओलच्या बाबतीत. ...

बॉबी देओलला सुपरस्टार बनवण्याच्या तयारीत लागला सलमान खान
स मानने जिसके सर पर हाथ रखा उसकी तकदीर बदलते देर नही लगती असेच काहीसे म्हणावे लागले बॉबी देओलच्या बाबतीत. सलमानने आजवर अनेकांची करिअर बॉलिवूडमध्ये घडवली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून स्क्रिनपासून लांब असलेल्या बॉबी देओलला कमबॅक करण्याची संधी सलमानने 'रेस 3' चित्रपटातून दिली. सध्या आबु धाबीमध्ये या चित्रपटाची शूटिंग सुरु आहे. यात बॉबी देओल महत्त्वाची भूमिका साकारतो आहे. मिळालेल्या माहितीनुसार सलमान खान बॉबीवर खूप खुश आहे. काही दिवसांपूर्वी सलमानने बॉबी देओलचा 'रेस 3'मधला फर्स्ट लूक शेअर केला होता. हा लूक शेअर करताना सलमानने लिहिले होते कि, 'The Main Man'. सलमानने आपल्या चित्रपटात त्याला मुख्य भूमिका दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सलमान आपला आगामी चित्रपट किक 2 मध्ये सुद्धा बॉबीला घेण्याचा प्लॉन बनवतो आहे. त्यामुळे 'किक 2'सुद्धा बॉबीचे एंट्री होण्याची शक्यता आहे. किकच्या पहिल्या भागात रणदीप हुड्डाने मुख्य भूमिका साकारली होती. ऐवढेच नाही तर साजिद नाडियाडवाल्याशी बोलून सलमानने बॉबीला 'हाऊसफुल्ल 4'मध्ये सुद्धा काम मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. हा सिलसिला इथवरचा थांबलेला नाही सल्लूमियां आपला आगामी चित्रपट 'भारत'मध्ये बॉबीला घेण्यासंदर्भात अली अब्बास जफरशी बोलतो आहे. यावरुन असे वाटते आहे की सलमानला बॉबीला सुपरस्टार बनण्याच्या विचारात आहे.
ALSO READ : अन् दिग्दर्शकाने संतापून घेतला ‘या’ अभिनेत्रीच्या हाताला चावा! बॉबी देओलने सांगितलेला २० वर्षांपूर्वीचा किस्सा!
‘रेस-३’ची घोषणा झाली तेव्हापासूनच प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यातच सलमान, जॅकलीन आणि आता बॉबीचा लूक समोर आल्याने सर्वांनाच चित्रपटाबद्दल उत्सुकता लागली आहे.‘रेस’ फ्रेंचाइजीच्या तिसºया भागात सलमान बघावयास मिळणार असल्याने चित्रपटात जबरदस्त तुफान बघावयास मिळणार आहे. ‘रेस-३’मध्ये सलमान, जॅकलीनसह अनिल कपूर, डेजी शाह, बॉबी देओल आणि साकिब सलीम बघावयास मिळणार आहेत. रेमो डिसूजा दिग्दर्शित हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.