सलमान खानच्या ‘भारत’ला सेन्सॉरचा एकही ‘कट’ नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 08:00 IST2019-05-29T08:00:00+5:302019-05-29T08:00:02+5:30

सध्या सलमान व कतरीना ‘भारत’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला पास केले आहे आणि आता हा चित्रपट प्रदर्शनासाठी तयार आहे.

salman khan starrer bharat gets a u/a certificate without any cuts from the censor board | सलमान खानच्या ‘भारत’ला सेन्सॉरचा एकही ‘कट’ नाही!

सलमान खानच्या ‘भारत’ला सेन्सॉरचा एकही ‘कट’ नाही!

ठळक मुद्देसलमान व कतरीनाशिवाय दिशा पाटणी, तब्बू, जॅकी श्रॉफ, सुनील ग्रोव्हर यांच्याही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. 

अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘भारत’ या चित्रपटाची घोषणा झाली आणि तेव्हापासून या चित्रपटाची चर्चा सुरु झाली. सलमान खान आणि कतरीना कैफ स्टारर हा चित्रपट यंदाचा बहुप्रतिक्षीत चित्रपट आहे. सध्या सलमान व कतरीना ‘भारत’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला पास केले आहे आणि आता हा चित्रपट प्रदर्शनासाठी तयार आहे.
सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला यू/ए सर्टिफिकेट दिले आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटातील एकाही दृश्यावर सेन्सॉर बोर्डाची कात्री चालली नाही. म्हणजेच, एकाही दृश्याला कात्री न लावता हा चित्रपट पास झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेन्सॉर बोर्डाच्या टीमने चित्रपटाची प्रशंसा केली. केवळ इतकेच नाही तर एक इंटरेस्टिंग प्लॉट रचल्याबद्दल दिग्दर्शक अली अब्बास जफरचे विशेष कौतुकही केलेय.


‘भारत’ हा चित्रपट सलमानसाठी आत्तापर्यंतचा सर्वात महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. या चित्रपटाकडून त्याला प्रचंड अपेक्षा आहेत. आधी या चित्रपटात प्रियंका चोप्राची वर्णी लागली होती. पण प्रियंकाने ऐनवेळी अंग काढून घेतले होते. शूटींग पाच दिवसांवर आले असताना प्रियंकाने या चित्रपटासाठी नकार दिला होता. यासाठी देसी गर्लने लग्नाचे कारण दिले होते.

लग्न करणार असल्याने मी चित्रपटाला वेळ देऊ शकत नाही, अशी तिची सबब होती. इतक्या ऐनवेळी प्रियंकाने नकार दिल्याने ‘भारत’च्या अख्ख्या टीमला धक्का बसला होता. प्रियंकाच्या नकारानंतर मेकर्सला घाईघाईत कॅटरिना कैफला साईन करावे लागले होते. साहजिकचं प्रियंकाच्या या अडेलतट्टू वागण्याने भाईजान कमालीचा संतापला होता. सलमान व कतरीनाशिवाय दिशा पाटणी, तब्बू, जॅकी श्रॉफ, सुनील ग्रोव्हर यांच्याही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. 

Web Title: salman khan starrer bharat gets a u/a certificate without any cuts from the censor board