‘दबंग 3’च्या ट्रेलरमध्ये झाली एक मोठी चूक, तुम्हाला दिसली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 13:44 IST2019-10-24T13:43:37+5:302019-10-24T13:44:08+5:30

3 मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये अ‍ॅक्शनसोबत कॉमेडीही दिसली. सोबत एक चूकही.

salman khan sonakshi sinha film dabangg 3 official trailer has a mistake | ‘दबंग 3’च्या ट्रेलरमध्ये झाली एक मोठी चूक, तुम्हाला दिसली?

‘दबंग 3’च्या ट्रेलरमध्ये झाली एक मोठी चूक, तुम्हाला दिसली?

ठळक मुद्दे ‘दबंग 3’ येत्या 20 डिसेंबरला प्रदर्शित होतोय.

बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खान याच्या ‘दबंग 3’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय. ‘दबंग’ सीरिजच्या आधीच्या दोन चित्रपटांप्रमाणे या चित्रपटातही सलमान चुलबुल पांडेचे आयकॉनिक कॅरेक्टर साकारताना दिसणार आहे. काल या चित्रपटाचा ट्रेलर झाला. 3 मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये अ‍ॅक्शनसोबत कॉमेडीही दिसली. सोबत एक चूकही. होय, या ट्रेलरमधील एक मोठी चूक अनेकांनी हेरली. काळजीपूर्वक बघितल्यास तुम्हालाही ती दिसेल.

दबंग 3’बाबतचे सर्व रचनात्मक निर्णय सलमानने घेतले. पण एक गोष्ट मात्र सलमानच्या नजरेतून नेमकी सुटली. होय, ‘दबंग 3’ येत्या 20 डिसेंबरला प्रदर्शित होतोय. पण ट्रेलरच्या शेवटी डिसेंबरचे स्पेलिंग लिहिताना गल्लत झाली आहे. सुरुवातीला डिसेंबरचे स्पेलिंग बरोबर आहे. पण दुसºयांदा रिलीज डेटमध्ये डिसेंबरचे स्पेलिंग Decemeber  असे लिहिले गेले आहे. आता सलमान ही चूक किती लवकरच सुधारतो, तेच बघायचेय.


 ‘दबंग 3’ हा ‘दबंग’ फ्रॅन्चाइजीचा तीसरा चित्रपट आहे. याआधी प्रदर्शित झालेल्या दोनही चित्रपटांनी बॉक्स ऑफीसवर कोट्यवधी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटांमध्ये सलमान खान व  सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत होते. ‘दबंग 3’मध्ये सलमान व सोनाक्षी मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय  मराठी सुपरस्टार महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर ही देखील या चित्रपटामध्ये अभिनय करताना दिसेल.
दबंग चित्रपट मालिकेत सलमानने चुलबुल पांडे ही व्यक्तिरेखा साकारली आहे. हा चित्रपट फ्लॅशबॅक फॉरमॅटमध्ये तयार केला गेला आहे. यांत पोलिस अधिकारी होण्याच्या आधी चुलबुल कसा होता? हे कथानक दाखवले जाणार आहे.  

 

Web Title: salman khan sonakshi sinha film dabangg 3 official trailer has a mistake