वास्तव 2! लॉकडाऊनमध्ये मोकाट फिरणा-यांनो सलमानने शेअर केलेली ही शॉर्टफिल्म बघाच...!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 14:15 IST2020-04-09T14:09:29+5:302020-04-09T14:15:07+5:30
काय होते ते तुम्हीच बघा...

वास्तव 2! लॉकडाऊनमध्ये मोकाट फिरणा-यांनो सलमानने शेअर केलेली ही शॉर्टफिल्म बघाच...!!
कोरोना व्हायरसमुळे अख्ख्या जगाला धडकी भरली आहे. देशातील कोरोना रूग्णांचे आकडेही धडकी भरवणारे आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन आहे. सरकार वारंवार लोकांना लॉकडाऊनचे पालन करण्याचे आवाहन करतेय. पण याऊपरही लोक बेफिकर होत रस्त्यांवर हिंडताना दिसत आहेत. कोरोनाला न जुमानणा-या या बेफिकरांनी सलमान खानने शेअर केलेला हा व्हिडीओ बघायलाच हवा. लॉकडाऊन तोडणे किती भयावह ठरू शकते, हे तो या व्हिडीओतून सांगतोय.
सलमानने शेअर केलेला हा व्हिडीओ मुळात एक शॉर्टफिल्म आहे. होय, दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी घरात राहून आपल्या लेकींसोबत ही शॉर्टफिल्म बनवली आहे. या शॉर्टफिल्मचे नाव आहे, ‘वास्तव 2’. हीच शॉर्टफिल्म सलमानने शेअर केली आहे.
शॉर्टफिल्मच्या सुरुवातीला महेश मांजरेकर यांचा आवाज ऐकू येतो आणि नंतर शॉर्टफिल्म सुरु होते. सलमानसोबत ‘दबंग 3’मधून डेब्यू करणा-या सई मांजरेकर हिने यात मुख्य भूमिका साकारली आहे. सोबत महेश मांजरेकरही आहेत. लॉकडाऊन असताना महेश मांजरेकर घराबाहेर पडतात आणि जाणता अजाणता कोरोनाचे संकट घरी घेऊन येतात. पुढे काय होते ते तुम्हीच बघा...