फोटो पाहून ओळखा कोण आहे 'ही' बॉलिवूडमधली प्रसिद्ध जोडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 17:12 IST2018-11-15T17:06:45+5:302018-11-15T17:12:58+5:30

सलमान खानचा बहुप्रतीक्षित सिनेमा भारतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे. सलमान खान वाघा बॉर्डरवर सूट घालून पाकिस्तानच्या दिशेने पाहताना दिसतोय

Salman Khan Shared Bharat Movie Photo On Social Media | फोटो पाहून ओळखा कोण आहे 'ही' बॉलिवूडमधली प्रसिद्ध जोडी

फोटो पाहून ओळखा कोण आहे 'ही' बॉलिवूडमधली प्रसिद्ध जोडी

ठळक मुद्देचित्रपटाची कथा १९४७ म्हणजे, भारत-पाक फाळणीच्या काळापासून सुरु होईल ‘भारत’ हा चित्रपट ‘आॅड टू माई फादर’ या कोरियन चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे

सलमान खानचा बहुप्रतीक्षित सिनेमा भारतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे. सलमान खान वाघा बॉर्डरवर सूट घालून पाकिस्तानच्या दिशेने पाहताना दिसतोय त्याच्यासोबत कॅटरिना कैफदेखील या फोटोत दिसतेय. दोघांचे ही चेहरे या फोटोत दिसत नाहीत. 

चित्रपटाची कथा १९४७ म्हणजे, भारत-पाक फाळणीच्या काळापासून सुरु होईल. भारत नावाच्या एका सामान्य व्यक्तिची कथा यात दिसेल. मी परतलो नाही तर तू कुटुंबाचा सांभाळ करशील, असे भारतचे वडिल फाळणीच्या काळात स्थलांतर करताना भारतला सांगतात. या कथेत भारतचा ५० वर्षांचा प्रवास दाखवला जाणार असल्याने प्रत्येक दहा वर्षांच्या अंतराने सलमानचे लूक बदलताना दिसेल. यातले एक लूक मॉडर्न असेल. याकाळात त्याला कॅटरिना व त्याचे प्रेम होईल आणि नंतर लग्न. ‘भारत’मध्ये सलमान खान १० वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. सलमान-कॅटशिवाय यात  तब्बू, जॅकी श्रॉफ आणि दिशा पाटनी हे अन्य कलाकारही यात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. ‘भारत’ हा चित्रपट ‘आॅड टू माई फादर’ या कोरियन चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.

सिनेमाच्या कथेनुसार, सलमानला आपल्या कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी सर्कशीत काम करावे लागते. यात तो ‘मौत का कुआँ’मध्ये मोटरसायकलवर चित्तथरारक कसरती करताना दिसेल. त्याच्यासोबत या काळात दिशा पाटनीही दिसेल. दिशाने यात सलमानच्या बहिणीची भूमिका साकारली असल्याचे कळतेय. 

Web Title: Salman Khan Shared Bharat Movie Photo On Social Media