जर सलमान खानने केले असते हे सिनेमे तर शाहरूख खान बनला नसता 'किंग ऑफ बॉलिवूड'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 12:46 PM2023-02-15T12:46:48+5:302023-02-15T12:47:07+5:30

Shah Rukh Khan : आज आम्ही तुम्हाला एक फारच इंटरेस्टींग गोष्ट सांगणार आहोत. सलमान खानने दोन असे सिनेमे नाकारले ज्यामुळे ते शाहरूख खानकडे आले आणि ते सुपरहिट झाले.

Salman Khan rejected Baazigar and Chak De India Shah Rukh Khan career best films | जर सलमान खानने केले असते हे सिनेमे तर शाहरूख खान बनला नसता 'किंग ऑफ बॉलिवूड'

जर सलमान खानने केले असते हे सिनेमे तर शाहरूख खान बनला नसता 'किंग ऑफ बॉलिवूड'

googlenewsNext

Shah Rukh Khan : सलमान खान (Salman Khan) आणि शाहरूख खान मैत्री नेहमीच चर्चेत असते. शाहरूख खानचा पठाण सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे आणि यात सलमान खानचा कॅमिओही आहे. दोघेही एकमेकांबाबत नेहमीच काहीना काही बोलत असतात. शाहरूख खान अडचणीत असतानाही सलमान त्याच्यासोबत उभा होता. पण आज आम्ही तुम्हाला एक फारच इंटरेस्टींग गोष्ट सांगणार आहोत. सलमान खानने दोन असे सिनेमे नाकारले ज्यामुळे ते शाहरूख खानकडे आले आणि ते सुपरहिट झाले.

शाहरूख खान, काजोल आणि शिल्पा शेट्टीच्या 'बाजीगर' सिनेमा 1993 मध्ये रिलीज झाला होता. शाहरूख खानचा हा सिनेमा खूप गाजला होता. त्याच्या भूमिकेला खूप पसंत केलं गेलं होतं. हा त्याच्या करिअरमधील सगळ्यात यशस्वी सिनेमांपैकी एक मानला जातो. असं सांगितलं जातं की, बाजीगर सिनेमा सलमान खानला ऑफर करण्यात आला होता. पण त्याने काही कारणाने या सिनेमाला नकार दिला होता. बाजीगर सिनेमा अब्बास मस्तान यांनी डायरेक्ट केला होता. 

तसेच आणखी एक सिनेमा आहे ज्याला सलमान खान याने नकार दिला होता. जो शाहरूख खानने केल्यानंतर सुपरहिट झाला. हा सिनेमा म्हणजे 2007 मध्ये आलेला 'चक दे इंडिया'होता. असं सांगितलं जातं की, या सिनेमासाठी आधी सलमान खान या विचारणा करण्यात आली होती. पण त्याने हा सिनेमा केला नाही. त्यामुळे हा सिनेमा शाहरूख खानकडे गेला. शाहरूख खानची यातील कबीर खानची भूमिका त्याच्या खास भूमिकांपैकी एक मानली जाते.

Web Title: Salman Khan rejected Baazigar and Chak De India Shah Rukh Khan career best films

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.