सलमान खानच्या हातात दिसणारं बाळ कुणाचं, जाणून घ्या याबाबत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 16:25 IST2020-01-16T16:20:11+5:302020-01-16T16:25:45+5:30

सलमानचा बाळासोबतचा हा फोटो होतोय व्हायरल.

Salman khan photo with niece ayat arpita khan share photo | सलमान खानच्या हातात दिसणारं बाळ कुणाचं, जाणून घ्या याबाबत

सलमान खानच्या हातात दिसणारं बाळ कुणाचं, जाणून घ्या याबाबत

सलमान खानच्या वाढदिवशीच अर्पिताने आयतला जन्म दिला. भाईजानच्या 54 व्या वाढदिवशी त्याला एक अनमोल गिफ्ट देणार असल्याचे अर्पिताने आधीच जाहीर केले होते. त्यानुसार, अर्पिताने सलमानच्या वाढदिवशी म्हणजे 7 डिसेंबरला सी सेक्शनद्वारे गोंडस मुलीला जन्म दिला. सलमान खानने आयत हातात घेतल्याचा पहिला फोटो समोर आला आहे. या फोटोला अर्पिता खानने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहे. 


या फोटोत सलमानसोबत त्याची आई सलमा खानसुद्धा दिसतायेत. दोघांच्या नजरा आयतला निहाळताना दिसतायेत. या फोटोसोबत अर्पिताने एक सुंदर कॅप्शनसुद्धा लिहिले आहे.   


आयतचा फोटो शेअर करताना आयुषनेसुद्धा लिहिले होते की, ‘आयत, या सुंदर जगात तुझे स्वागत आहे. तू आमच्या आयुष्यात खूप सारा आनंद घेऊन आलीस. तू सर्वांच्या आयुष्यात कायम आनंद पेरशील, अशी आशा करतो,’ असे आयुषने हे फोटो शेअर करताना लिहिले आहे.


अर्पिता खान शर्माचे हे दुसरे अपत्य आहे. 18 नोव्हेंबर 2014 मध्ये अर्पिताने तिच्यापेक्षा एक वर्ष लहान बॉयफ्रेन्ड आयुष शमार्सोबत लग्न केले. आयुष हा हिमाचल प्रदेशातील सर्वाधिक प्रतिष्ठित राजकीय घराण्याचा वारसदार आहे. अर्पिता आणि आयुष यांना आहिल नावाचा एक मुलगा आहे. 
मुळात सलमान खान बहीण अर्पिता खानवर जितके प्रेम करतो, त्याच्या कैकपट प्रेम अहिलवर करतो. मामा-भाच्याच्या जोडीचे प्रेम चाहत्यांनी अनेकदा पाहिले आहे. त्यामुळे आता अहिलनंतर मामा सलमानचे अर्पिताच्या मुलीचे बॉन्डींग कसे बनणार हे ही पाहणे रंजक असणार आहे.
 

Web Title: Salman khan photo with niece ayat arpita khan share photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.