सलमान खानने घेतला धसका! बदलली ‘दबंग 3’ची रिलीज डेट!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 13:47 IST2018-11-12T13:46:22+5:302018-11-12T13:47:29+5:30

सलमान खानने ‘दबंग 3’ नक्की बनणार, असे जाहिर केले आणि चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली. तेव्हापासून चाहते या चित्रपटाकडे डोळे लावून बसलेत. पण आता कदाचित ‘दबंग 3’साठी चाहत्यांना मोठी प्रतीक्षा करावी लागणार, असे दिसतेय.

salman khan once again changed dabangg 3 release date because of aamir khans thugs of hindostan | सलमान खानने घेतला धसका! बदलली ‘दबंग 3’ची रिलीज डेट!!

सलमान खानने घेतला धसका! बदलली ‘दबंग 3’ची रिलीज डेट!!

सलमान खाननेदबंग 3’ नक्की बनणार, असे जाहिर केले आणि चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली. तेव्हापासून चाहते या चित्रपटाकडे डोळे लावून बसलेत. पण आता कदाचित ‘दबंग 3’साठी चाहत्यांना मोठी प्रतीक्षा करावी लागणार, असे दिसतेय. होय, आता हा चित्रपट २०१९ ऐवजी २०२० मध्ये रिलीज होण्याची चिन्हे आहेत. खरे तर, येत्या मार्चमध्ये ‘दबंग 3’चे शूटींग सुरु होणार, हे अरबाजने सांगितले होते. पुढील वर्षी नाताळच्या मुहूर्तावर हा चित्रपट रिलीज करण्याचा इरादाही त्याने बोलून दाखवला होता. पण ताजी बातमी खरी मानल तर, पुढील वर्षाअखेर हा चित्रपट रिलीज होणे अशक्य वाटतेय. याचे कारण म्हणजे, सलमान खान ‘दबंग 3’च्या स्क्रिप्टबद्दल कुठलीही तडजोड करण्यास तयार नाही. चित्रपटाची पटकथा अधिकाधिक आकर्षक करण्यावर त्याचा जोर आहे. त्याने त्याच्या टीमला तसे स्पष्टपणे बजावले आहे.
अलीकडचे ‘जब हॅरी मेट सेजल’, ‘ट्युबलाईट’, ‘रेस 3’ आणि नुकताच रिलीज झालेला ‘ठग्स आॅफ हिंदूस्तान’ची बॉक्सआॅफिसवर झालेली गत सलमान बघून आहे. कमजोर पटकथेमुळे प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली. कदाचित सलमानने यापासून घ्यायचा तो धडा घेतलाय आणि याचमुळे ताक सुद्धा फुंकून प्यायचे त्याने ठरवलेले दिसतेय. साहजिकचं, ‘दबंग 3’च्या बाबतीत असे काही व्हायला नको असे त्याने मनाशी पक्के ठरवले आहे. बेस्ट स्क्रिप्ट मिळत नाही, तोपर्यंत हा चित्रपट फ्लोरवर येणार नाही, यावर तो ठाम आहे.
‘दबंग 3’मध्ये सलमान व सोनाक्षी सिन्हा यांच्याशिवाय आणखी एक अभिनेत्री महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या हिरोईनचे नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. एकंदर काय तर ‘दबंग 3’साठी मोठी प्रतीक्षा करणे चाहत्यांना भाग आहे.
तूतार्स सलमान खान ‘भारत’च्या शूटींगमध्ये बिझी आहे. या चित्रपटात सलमानशिवाय कॅटरिना कैफ, दिशा पटनी, तब्बू मुख्य भूमिकेत आहेत.

Web Title: salman khan once again changed dabangg 3 release date because of aamir khans thugs of hindostan