सलमानला एकही रुपया नको, तर नयनताराचं मानधन ऐकून नेटकरी अवाक! दिल राजूच्या चित्रपटात पहिल्यांदाच दिसणार ही जोडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 12:33 IST2026-04-03T12:32:01+5:302026-04-03T12:33:29+5:30
सलमान खान दाक्षिणात्य सुपरस्टार नयनतारासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

सलमानला एकही रुपया नको, तर नयनताराचं मानधन ऐकून नेटकरी अवाक! दिल राजूच्या चित्रपटात पहिल्यांदाच दिसणार ही जोडी
Salman Khan Nayanthara Dil Raju Film : बॉलिवूडचा 'सुलतान' सलमान खान (Salman Khan) आणि दाक्षिणात्य सुपरस्टार नयनतारा (Nayanthara) ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. प्रसिद्ध निर्माते 'दिल राजू' आणि दिग्दर्शक वामशी पैडिपल्ली यांच्या आगामी चित्रपटात हे दोन्ही दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. मात्र, सध्या या चित्रपटापेक्षा या दोघांच्या मानधनाची चर्चा सोशल मीडियावर जोरात सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानने या चित्रपटासाठी त्याचे नेहमीचे कोट्यवधींचे मानधन नाकारलं आहे. त्याऐवजी, त्याने 'प्रॉफिट शेअरिंग' (Profit-sharing) मॉडेल निवडले. याचा अर्थ असा की, चित्रपट बॉक्स ऑफिसवर जेवढी कमाई करेल, त्यातील ठराविक हिस्सा सलमानला मिळेल. यामुळे निर्मात्यांवरील सुरुवातीचा आर्थिक बोजा कमी झाला आहे. तर सलमानची एकूण कमाई चित्रपटाच्या यशावर अवलंबून असेल.
नयनताराने आकारली मोठी रक्कम
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी नयनतारा ओळखली जाते. एकीकडे सलमानने मानधन नाकारले असले तरी, नयनताराने मात्र या चित्रपटासाठी तगडी फी घेतल्याचे बोलले जात आहे. 'Siasat Daily' च्या वृत्तानुसार, नयनताराने या चित्रपटासाठी अंदाजे १० कोटी रुपये मानधन घेतले आहे. निर्मात्यांनी अद्याप यावर अधिकृत शिक्कामोर्तब केलेले नाही.
शूटिंगला एप्रिलपासून सुरुवात
सलमान खानने ३० मार्च रोजी दिग्दर्शक वामशी पैडिपल्ली यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत नवीन चित्रपटाची घोषणा केली होती. "माझ्या संपूर्ण हृदयाने आणि आत्म्याने मी एप्रिलपासून वामशी आणि दिल राजू यांच्यासोबत असेन", असे त्याने कॅप्शनमध्ये लिहिले होते. चाहते आता सलमान आणि नयनतारा ही 'पॉवरफुल' जोडी पाहण्यासाठी आतापासूनच उत्सुक आहेत.