सलमान खान अन् ऋषी कपूर यांच्यात वाढली दरी! ‘ही’ एक घटना ठरली कारण!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 10:50 IST2018-07-05T10:46:16+5:302018-07-05T10:50:48+5:30
सोनम कपूरच्या संगीत सेरेमनीदरम्यानच्या एका बातमीने सगळ्यांना धक्का बसला होता. ही बातमी होती, ऋषी कपूर यांच्याबद्दलची.

सलमान खान अन् ऋषी कपूर यांच्यात वाढली दरी! ‘ही’ एक घटना ठरली कारण!!
सोनम कपूरच्या संगीत सेरेमनीदरम्यानच्या एका बातमीने सगळ्यांना धक्का बसला होता. ही बातमी होती, ऋषी कपूर यांच्याबद्दलची. या पार्टीत ऋषी कपूर यांनी सोहेल खानच्या पत्नीसोबत गैरवर्तन केल्याची. या बातमीने सगळ्यांचेच कान टवकारले होते. शिवाय यानंतर खान कुटुंब ऋषी कपूर यांच्यावर नाराज असल्याची बातमीही आली होती. सलमान खानला पार्टीतील ही गोष्ट कळल्यानंतर त्याची प्रतिक्रिया काय असेल, असा एक प्रश्न यानंतर अनेकांच्या मनात आला होता. आता याच संदर्भात एक अपडेट बातमी आहे.
होय, डेक्कन क्रॉनिकलने दिलेल्या वृत्तानुसार, या घटनेनंतर सलमान स्वत: ऋषी कपूर यांच्याशी बोलला. पण ऋषी कपूर आपल्या म्हणण्यावर ठाम राहिले. मी काहीही केलेले नाही. माफी मागणार नाही, असे ऋषी यांनी सलमानला स्पष्टपणे सांगितले. आता मी काही केलेच नाही, असे ऋषी कपूर यांनी दाव्यानिशी सांगितल्यावर सलमान काय करणार? त्याचा पुरता नाईलाज झाला. तो शांत झाला. पण खरे सांगायचे सलमान ही घटना विसणाऱ्यांपैकी नाही. आता या घटनेचा सूड तो कुठल्या पद्धतीने उगवतो, ते पाहूच.
तसेही ऋषी कपूर यांच्यासोबत सलमानचे आधीच वावडे आहे. केवळ त्यांच्याशीच नाही तर त्यांचा मुलगा रणबीर कपूर यांच्यासोबत तर सलमानचा ३६ चा आकडा आहे. याचे कारण अर्थातच तुम्हाला ठाऊक आहे. सलमानला सोडून कॅटरिना कैफ रणबीर कपूरच्या प्रेमात पडली होती. हाच तो राग आहे. आज कॅटरिना व रणबीरचे ब्रेकअप झाले आहे. पण अद्यापही हा सलमानच्या मनात रणबीरबद्दलचा राग कायम आहे. त्यामुळेच सलमान व रणबीर दोघेही आमने-सामने येणे टाळतात.