सलमान खानने कॅटरिना कैफसाठी केले युलिया वंतूरसोबत ब्रेकअप ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2017 10:51 IST2017-10-19T05:21:26+5:302017-10-19T10:51:26+5:30
खरंच सलमान खान आणि युलिया वंतूरचे ब्रेकअप झाले आहे का ? गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत चर्चा होते आहे. आता ...

सलमान खानने कॅटरिना कैफसाठी केले युलिया वंतूरसोबत ब्रेकअप ?
ख ंच सलमान खान आणि युलिया वंतूरचे ब्रेकअप झाले आहे का ? गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत चर्चा होते आहे. आता मात्र या प्रश्नाचे उत्तर मिळायला सुरुवात झाली आहे. युलियाचा भारतातला व्हिजा संपला आहे आणि सध्या ती तिच्या मायदेशात परतली आहे. दरवेळी युलियाचा व्हिजाचा अवधी वाढवणाऱ्या सलमानने यावेळी असे नाही केले म्हणून युलियाला तिच्या देशात परतावे लागले आहे. चर्चा तर अशी पण सुरु आहे की युलियाची दिवसांदिवस सलमानच्या आयुष्यातील वाढती ढवळाढवळ त्याला आवडली नाही आणि या कारणामुळे तिला लांब करण्यात आले आहे. तर दुसर कारण आहे सलमान आयुष्यात तिच्या एक्स गर्लफ्रेंड कॅटरिना कैफ परत आली आहे. कॅटरिनाचे रणबीर कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर टायगर जिंदा है च्या शूटिंग दरम्यान त्याच्या जवळीकता पुन्हा एकदा वाढली आहे.
याच कारणामुळे युलियाने टायगर जिंदा हैच्या शूटिंग दरम्यान आबु धाबीला येण्यासाठी हट्ट केला होता. मात्र सलमान तसे होऊन दिले नाही. सध्या युलिया तिच्या घरी परतली आहे ही एक गोष्ट सलमनाचा युलियामधला इंटरेस्ट कमी झाला आहे याची साक्ष देतो. युलियाचा व्हिजा वाढवून घेण्यासाठी सलमानला खूप वेळ लागला नसता.
गेल्या तीन वर्षांपासून युलिया सलमानच्या आयुष्यात आहे. सलमानच्या घरातल्या प्रत्येक फॅमिली फंक्शनमध्ये ती नेहमी हजर दिसायची. मात्र दिवाळी निमित्त सलमानची बहिण अर्पिता खान हिने दिलेल्या दिवाली पार्टीत युलिया दिसली नाही मात्र कॅटरिना कैफने आर्वजून उपस्थिती लावली होती. आतापर्यंत असे दिसून आले आहे की युलिया असताना कॅटरिना त्याठिकाणी येण्याचे टाळते. मात्र या पार्टी युलिया वंतूरने येणे टाळले.
ALSO READ : भाईजानचा ‘दिवाळी धमाका’! ‘टायगर जिंदा है’चे पहिले पोस्टर जारी करत दिली दिवाळी भेट!!
सलमान खान आणि कॅटरिना कैफच्या जोडीचा टायगर जिंदा है ख्रिसमध्ये रिलीज होणार आहे. काही दिवसांपूर्वीच सलमानने या चित्रपटाची शूटिंग आबुधाबीमध्ये पूर्ण केली आहे. हा एक था टायगरला सीक्वल आहे. कॅटरिना आणि सलमानचे ब्रेकअप झाल्यानंतर त्यांचा हा पहिला चित्रपट आहे. तब्बल पाच वर्षांनंतर दोघांची केमिस्ट्री पाहण्यासाठी त्याचे फॅन्स उत्सुक आहेत