अभिषेक बच्चनमुळे ‘धूम4’मधून आऊट झाला सलमान खान!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 21:20 IST2018-08-20T21:16:30+5:302018-08-20T21:20:09+5:30
यशराज बॅनरची हिट सीरिज ‘धूम’ची चर्चा तेव्हीही होती आणि आजही आहे. होय,आत्तापर्यंत या सुपरडुपर हिट चित्रपटाचे तीन पार्ट आले आहेत आणि आता ‘धूम4’ ची तयारी सुरू झाली आहे.

अभिषेक बच्चनमुळे ‘धूम4’मधून आऊट झाला सलमान खान!!
यशराज बॅनरची हिट सीरिज ‘धूम’ची चर्चा तेव्हीही होती आणि आजही आहे. होय,आत्तापर्यंत या सुपरडुपर हिट चित्रपटाचे तीन पार्ट आले आहेत आणि आता ‘धूम4’ ची तयारी सुरू झाली आहे. कालपरवाचं ‘धूम4’बद्दल आम्ही एक बातमी तुम्हाला दिली होती. होय, ‘धूम4’मध्ये सलमान खानच्या जागी शाहरूख खानची वर्णी लागल्याची ही बातमी होती. या चित्रपटात सलमान खान चोराची भूमिका साकारणार, अशी बातमी सर्वात आधी आली होती. सलमानसोबतचं रणवीर सिंगचे नावही या सीरिजसाठी चर्चेत होते. पण कालपरवा सलमानऐवजी आदित्यने शाहरूख खानला पसंती दिल्याचे समोर आले. आता या चित्रपटातून सलमानचा पत्ता का कट झाला, हेही आता समोर आले आहे.
होय, ‘धूम’ सीरिजमध्ये चोर तर बदलले पण पोलिस मात्र अभिषेक बच्चनचं बनला. पण सलमानला अभिषेक बच्चन नको होता. पोलिसाच्या भूमिकेत अभिषेकऐवजी दुसऱ्या कुणाला घ्यावे, असे त्याने ‘धूम4’च्या मेकर्सला सांगितले होत़े. पण मेकर्सला सलमानचे हे अॅटिट्यूड खटकले आणि त्यांनी अभिषेकऐवजी सलमानलाच बाहेर केले.
अजूनपर्यंत 'धूम4'ची स्क्रिप्ट ही अजून तयार नाही . विजय कृष्ण आचार्य या सिनेमावर काम करणार आहेत. ते आधी 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'चे काम पूर्ण करणार. त्यानंतर ते 'धूम 4'च्या स्क्रिप्टवर काम सुरु करणार.