चुलबुल पांडे आ गया...! पाहा,‘दबंग 3’च्या सेटवरचा पहिला फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 13:47 IST2019-04-01T13:47:14+5:302019-04-01T13:47:22+5:30

‘दबंग’ आणि ‘दबंग 2’ पाहिल्यानंतर ‘दबंग 3’ कधी एकदा येतो, असे चाहत्यांना झाले होते. अखेर आज इंदूरमध्ये या चित्रपटाच्या शूटींगचा शुभारंग झाला.

Salman Khan kickstarts Dabangg 3 shoot | चुलबुल पांडे आ गया...! पाहा,‘दबंग 3’च्या सेटवरचा पहिला फोटो!!

चुलबुल पांडे आ गया...! पाहा,‘दबंग 3’च्या सेटवरचा पहिला फोटो!!

ठळक मुद्दे‘भारत’आणि ‘दबंग 3’  हे दोन्ही चित्रपट एकाचवेळी शूट करण्याचा सलमानचा प्लान होता.   पण ‘रेस3’ रिलीज झाल्यानंतर सलमानने अचानक आपला प्लान बदलला आणि केवळ ‘भारत’चे शूटींग सुरू केले.

सलमान खानच्या चाहत्यांना ज्या क्षणाची प्रतीक्षा होती, तो क्षण आलाय. होय, सलमानचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘दबंग 3’चे शूटींग सुरु झाले आहे. चाहते दीर्घकाळापासून या चित्रपटाकडे डोळे लावून बसले होते. ‘दबंग’ आणि ‘दबंग 2’ पाहिल्यानंतर ‘दबंग 3’ कधी एकदा येतो, असे चाहत्यांना झाले होते. अखेर आज इंदूरमध्ये या चित्रपटाच्या शूटींगचा शुभारंग झाला. केवळ इतकेच नाही सेटवरचा सलमानचा फर्स्ट लूकही समोर आला. या फर्स्ट लूकमध्ये सलमान ‘चुलबुल पांडे’ स्टाईलमध्ये दिसतोय. त्याचा हा लूक चाहत्यांना क्रेजी करणार, यात शंका नाही.


‘दबंग 3’ या चित्रपटात सलमानच्या अपोझिट पुन्हा एकदा सोनाक्षी सिन्हाची वर्णी लागली आहे. सोनाक्षीने ‘दबंग’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर ‘दबंग 2’मध्येही सोना दिसली. आता ‘दबंग 3’मध्येही सोनाचा जलवा दिसणार आहे. सोनाक्षीसोबतच महेश मांजरेकरची मुलगी अश्वनी मांजरेकर ही सुद्धा यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.  अर्थात चित्रपटातील उर्वरित कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात आहेत. खरे तर सलमान खान २०१८च्या अखेरिस ‘दबंग 3’ चे शूटींग सुरू करणार होता.

‘भारत’आणि ‘दबंग 3’  हे दोन्ही चित्रपट एकाचवेळी शूट करण्याचा सलमानचा प्लान होता.   पण ‘रेस3’ रिलीज झाल्यानंतर सलमानने अचानक आपला प्लान बदलला आणि केवळ ‘भारत’चे शूटींग सुरू केले. असे का? तर सलमान खान एका वेळी केवळ एकाच चित्रपटावर लक्ष देऊ इच्छित होता. त्यामुळे त्याने  केवळ ‘भारत’चे शूटींग सुरू केले. या चित्रपटाचे शूटींग संपल्याबरोबर त्याने ‘दबंग 3’चे काम सुुरु केले. प्रभु देवा हा चित्रपट दिग्दर्शित करतोय.


 

Web Title: Salman Khan kickstarts Dabangg 3 shoot