‘टायगर जिंदा हैं’च्या शूटिंगसाठी सलमान खान, कॅटरिना कैफ आॅस्ट्रियाला रवाना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2017 13:46 IST2017-03-13T07:34:45+5:302017-03-13T13:46:51+5:30

बॉलिवूडचा ‘सुल्तान’ सलमान खान आणि कॅटरिना कैफ सध्या त्यांच्या अपकमिंग चित्रपट ‘टायगर जिंदा हैं’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. सध्या हे ...

Salman Khan, Katrina Kaif to Austria to shoot for 'Tiger Zinda Hai'! | ‘टायगर जिंदा हैं’च्या शूटिंगसाठी सलमान खान, कॅटरिना कैफ आॅस्ट्रियाला रवाना!

‘टायगर जिंदा हैं’च्या शूटिंगसाठी सलमान खान, कॅटरिना कैफ आॅस्ट्रियाला रवाना!

लिवूडचा ‘सुल्तान’ सलमान खान आणि कॅटरिना कैफ सध्या त्यांच्या अपकमिंग चित्रपट ‘टायगर जिंदा हैं’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. सध्या हे दोघेही या चित्रपटाच्या शूटिंगसाठी आॅस्ट्रिया येथे रवाना झाले असून, नुकतेच या दोघांना विमानतळावर बघण्यात आले आहे. 



मुंबई विमानतळावरून आॅस्ट्रियाला रवाना होत असताना दोघांनीही काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. वेगवेगळ्या कारमधून आलेल्या या दोघांनीही थेट फ्लाइटकडे धाव घेतली. २०१२ मध्ये आलेल्या सुपरहिट ‘एक था टायगर’ या सिनेमाचा ‘टायगर जिंदा हैं’ हा सीक्वल असून, रिलिज होण्याअगोदरच तो चर्चेत आहे. पहिल्या भागाचे कबीर खान यांनी दिग्दर्शन केले होते, तर दुसºया भागात अली अब्बास जफर दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. 



‘टायगर जिंदा हैं’ची शूटिंग येत्या १५ मार्चपासून सुरू होणार आहे. या सिनेमासाठी सलमानने त्याचे तब्बल २० किलो वजन कमी केले आहे. पहिल्या भागात सलमानने एजंटची भूमिका साकारली होती. सलमानबरोबरच कॅटरिनानेही सिनेमात जबरदस्त अ‍ॅक्शन केली होती. दोघांचा हा अंदाज प्रेक्षकांना चांगलाच भावला होता. दरम्यान, त्यावेळी दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते. आता त्यांच्यात ब्रेकअप झाले असल्याने त्यांच्यातील ट्यूनिंग कशी जुळणार हे बघणे मजेशीर ठरेल. 



कारण कॅटरिनाचे रणबीर कपूरबरोबरचे ब्रेकअप झाल्याने ‘जग्गा जासूस’ या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बरेचसे अडथळे आले होते. अशीच परिस्थिती या चित्रपटाबाबतही होईल का? याबाबतचे तर्कवितर्क लावले जात आहेत, परंतु विमानतळावर बघण्यात आलेल्या या दोघांच्या देहबोलीवरून तरी सर्वकाळी आलबेल असल्याचेच बघावयास मिळत आहे. त्यामुळे चित्रपटाच्या शूटिंगमध्ये कुठल्याही प्रकारचे विघ्न येणार नाही, हे तरी प्रथमदर्शनी दिसत आहे. 

Web Title: Salman Khan, Katrina Kaif to Austria to shoot for 'Tiger Zinda Hai'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.