चिरंजीवीच्या Godfatherमध्ये सलमान खानची एन्ट्री, भाईजान करणार साऊथमध्ये डेब्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 16:05 IST2022-03-16T16:01:56+5:302022-03-16T16:05:33+5:30

साऊथचा सुपरस्टार चिरंजीवी(Chiranjeevi) च्या 'गॉडफादर'(Godfather) चित्रपटात सलमान खान दिसणार आहे.

Salman khan joins chiranjeevi in his movie godfather watch first photo and know all about the movie | चिरंजीवीच्या Godfatherमध्ये सलमान खानची एन्ट्री, भाईजान करणार साऊथमध्ये डेब्यू

चिरंजीवीच्या Godfatherमध्ये सलमान खानची एन्ट्री, भाईजान करणार साऊथमध्ये डेब्यू

बॉलिवूडच्या सिनेमांमध्ये काम केल्यानंतर अभिनेता सलमान खान  (Salman Khan) आता टॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. साऊथचा सुपरस्टार    चिरंजीवी(Chiranjeevi) च्या 'गॉडफादर'(Godfather) चित्रपटात सलमान खान दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे सलमान तेलुगू चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार आहे. सलमानने आतापर्यंत अनेक तमिळ आणि तेलुगू चित्रपटांच्या हिंदी रिमेकमध्ये काम केले आहे. पण सलमान पहिल्यांदाच तेलगू चित्रपटात दिसणार आहे.

चिरंजीवीने सलमानचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि सोशल मीडियावर फोटोशेअर करत एक पोस्ट शेअर केली. चिरंजीवीने ट्विटरवर लिहिले, 'गॉडफादरमध्ये तुमचे स्वागत आहे भाऊ. तुझ्या एंट्रीने प्रत्येकामध्ये एनर्जी आली  आहे आणि उत्साहदेखील वाढला आहे. तुझ्यासोबत स्क्रीनिंग करताना आनंद होतो. 

Godfather हा Luciferचा तेलुगु रिमेक 
'गॉडफादर' सिनेमाचे दिग्दर्शन मोहन राजा करणार आहेत. हा मल्याळम सुपरहिट चित्रपट 'लुसिफर'चा रिमेक असेल. काही काळापूर्वी चिरंजीवीच्या 'गॉडफादर'मध्ये सलमान छोट्या भूमिकेत दिसणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण आता ते कन्फर्म झाले. 

रिपोर्ट्सनुसार, चिरंजीवीने सलमानला त्याच्या 'गॉडफादर' चित्रपटात छोटी भूमिका करण्याची विनंती केली होती. सलमानने मित्राला होकार दिला. सलमान आता या चित्रपटात छोटी भूमिका साकारणार आहे. ही भूमिका लूसिफरमधील पृथ्वीराज सुकुमारन यांच्यासारखीच असेल, असे बोलले जात आहे. या चित्रपटात पृथ्वीराज यांनी छोटी भूमिका केली होती.
 

Web Title: Salman khan joins chiranjeevi in his movie godfather watch first photo and know all about the movie