अमाप संपत्तीचा मालक असलेला सलमान वापरतो फाटके शूज; साधेपणाने जिंकली चाहत्यांची मनं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 11:18 AM2023-11-24T11:18:53+5:302023-11-24T11:20:23+5:30

Salman khan: सुपरस्टार असूनही सलमान वापरतो फाटके शूज; फर्रेच्या स्क्रिनिंगला फाटके बूट घालून पोहोचला भाईजान

salman-khan-is-the-owner-of-2900-cr-property-still-wears-torn-shoes | अमाप संपत्तीचा मालक असलेला सलमान वापरतो फाटके शूज; साधेपणाने जिंकली चाहत्यांची मनं

अमाप संपत्तीचा मालक असलेला सलमान वापरतो फाटके शूज; साधेपणाने जिंकली चाहत्यांची मनं

दमदार अभिनयशैली, जबरदस्त फिटनेस आणि लक्झरी लाइफस्टाइल यामुळे बॉलिवूड अभिनेता सलमान खान ( salman khan) याची कायम चर्चा रंगत असते. अलिकडेच त्याचा टायगर ३ हा सिनेमा रिलीज झाला. या चित्रपटाची सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार घोडदौड सुरु आहे. आतापर्यंत या सिनेमाने ४०० कोटींची कमाई केली आहे. विशेष म्हणजे सलमानचे सिनेमा बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करत असतानाही तो आजही वायफळ खर्च करताना दिसत नाही. सध्या सोशल मीडियावर सलमानचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये त्याने चक्क फाटलेले शूज घातल्याचं दिसून येत आहे.
 

सलमान आज जवळपास २९०० कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. मात्र, आजही तो फुटकळ कारणांसाठी पैसे खर्च करायचं टाळतो. याचा प्रत्यय नुकताच फर्रे सिनेमाच्या स्क्रिनिंगदरम्यान आला. फर्रे सिनेमाच्या स्क्रिनिंगला सलमानने अभिनेत्री कतरिना कैफ हिच्यासोबत हजेरी लावली होती. त्यावेळी सलमानचे शूज सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होते. कारण, सलमाचे शूज फाटलेले आणि जुने असल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे त्याच्या या शूजविषयी पलक तिवारी आणि जस्सी गिल यांनीही कमेंट केली आहे.

'ते इतके मोठे स्टार आहेत, त्यांच्याकडे अमाप संपत्ती आहे तरी सुद्धा त्यांचे शूज खराब झालेले असतात', असं पलक म्हणाली. तर, 'मला सुद्धा हेच सांगायचंय ते कायम चामड्याचे शूज घालतात ते काही वेळा फाटलेले असतात. मात्र, तरी सुद्धा ते शुटिंगला तसेच येतात. सलमान खान सांगतात की त्यांना या शूजमध्ये कम्फर्टेबल वाटतं', असं जस्सी गिलने सांगितलं.

दरम्यान, सलमानचे शूज पाहून लोकांनी त्याच्या साधेपणाचं कौतुक केलं आहे. इतका श्रीमंत असूनही तो डाऊन टू अर्थ असल्याचं म्हणत चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं आहे.

Web Title: salman-khan-is-the-owner-of-2900-cr-property-still-wears-torn-shoes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.