सलमान खान 'या' गंभीर आजाराचा करतोय सामना, कपिल शर्मा शोमध्ये अभिनेत्याने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 13:24 IST2025-06-22T13:24:28+5:302025-06-22T13:24:56+5:30

५९ वर्षांचा सलमान खान गंभीर आजारांचा सामना करतोय. त्यामुळे चाहत्यांना त्याची काळजी वाटली आहे.

Salman Khan is battling serious illness the actor revealed on The Kapil Sharma Show | सलमान खान 'या' गंभीर आजाराचा करतोय सामना, कपिल शर्मा शोमध्ये अभिनेत्याने केला खुलासा

सलमान खान 'या' गंभीर आजाराचा करतोय सामना, कपिल शर्मा शोमध्ये अभिनेत्याने केला खुलासा

सलमान खान हा बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता. सलमानला आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. सलमान आता ५९ वर्षांचा झाला आहे. तरीही सलमानचा फिटनेस त्याच्या चाहत्यांना थक्क करुन सोडतो. सलमान अलीकडेच कपिल शर्मा शोमध्ये सहभागी झाला होता. यावेळी सलमानने त्याला झालेल्या गंभीर आजारांचा खुलासा केला. सलमान वरुन जरी आनंदी दिसत असला तरी तो गंभीर आजारांचा सामना करतो आहे. सलमानने केलेला हा खुलासा ऐकून त्याचे चाहते काळजीत पडले आहेत.

सलमान करतोय या गंभीर आजाराचा सामना

कपिल शर्मा शोमध्ये सलमानने लग्नासंबंधी प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी सलमानने खुलासा केला की, "आम्ही असे आहोत जे रोज स्वतःची हाडं झिजवून काम करतोय. ट्राइजेमिनल न्यूराल्जिया असूनही काम करतोय. एवी मालफॉर्मेशन आहे तरीही रोज काही ना काही करतोय. ब्रेन एन्युरिज्मसारखा आजार आहे. माझ्या आयुष्यात हे सर्व चालू आहे. अशातच तिचं डोकं सटकलं तर आपल्या वाटणीचा अर्धा हिस्सा घेऊन जातो. तरुणवयात असं काही झालं असतं तर ठीक होतं. पुन्हा कमवलं असतं. परंतु या वयात पुन्हा सर्व म्हणजे खूप कष्ट आहेत." अशा शब्दात सलमानने घटस्फोटाचं उदाहरण देऊन त्याच्या आजाराचा खुलासा केला.


सलमानने उल्लेख केलेल्या एवी मालफॉर्मेशन, ब्रेन एन्युरिज्म, ट्राइजेमिनल न्यूराल्जिया हे गंभीर आजार आहेत. रक्तवाहिन्यांशी संबंधित हे आजार असून मेंदूला आणि शरीराला अनियमित रक्तपुरवठा झाल्याने या आजाराचे शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. या सर्व आजारांचा सामना करुनही काम करत असल्याने सलमानने स्वतःला धाडसी म्हटलं आहे. याशिवाय चाहत्यांनीही भाईजानचं कौतुक केलं आहे.

 

Web Title: Salman Khan is battling serious illness the actor revealed on The Kapil Sharma Show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.