"सलमान खान वाईट व्यक्ती आहे, तो गुंड आहे...", 'दबंग' दिग्दर्शकाने कुटुंबाबद्दल सांगितलं बरंच काही
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 12:16 IST2025-09-08T12:15:46+5:302025-09-08T12:16:15+5:30
Salman Khan : चित्रपट दिग्दर्शक अभिनव कश्यप यांनी अभिनेता सलमान खानबद्दल अनेक गंभीर विधानं केली आहेत. त्यांनी सलमानला 'गुंड' आणि 'वाईट माणूस' म्हटलं आहे. अभिनव कश्यप यांनीच सलमान खानच्या प्रसिद्ध 'दबंग' चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं.

"सलमान खान वाईट व्यक्ती आहे, तो गुंड आहे...", 'दबंग' दिग्दर्शकाने कुटुंबाबद्दल सांगितलं बरंच काही
चित्रपट दिग्दर्शक अभिनव कश्यप (Abhinav Kashyap) यांनी अभिनेता सलमान खान(Salman Khan)बद्दल अनेक गंभीर विधानं केली आहेत. त्यांनी सलमानला 'गुंड' आणि 'वाईट माणूस' म्हटलं आहे. अभिनव कश्यप यांनीच सलमान खानच्या प्रसिद्ध 'दबंग' चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं.
स्क्रीनला दिलेल्या मुलाखतीत अभिनव यांनी सलमान खानला एक वाईट माणूस म्हटलं. ते म्हणाले की, सलमान कधीच कामात पूर्णपणे सामील नसतो. त्याला अभिनयात कोणताही रस नाही, गेल्या २५ वर्षांपासून नाही. तो सेटवर येऊन जणू काही उपकारच करतो. त्याला एक सेलिब्रिटी म्हणून मिळालेल्या अधिकारांचा जास्त शौक आहे. पण अभिनयात त्याला कोणतीही आवड नाही. तो एक गुंड आहे. 'दबंग'च्या आधी मला हे माहीत नव्हतं. सलमान एक उद्धट आणि वाईट माणूस आहे.
दिग्दर्शकाने खान कुटुंबावर केली टीका
अभिनव कश्यप यांनी सलमानच्या कुटुंबावरही टीका केली. ते म्हणाले, सलमान खान हा बॉलिवूडमधील 'स्टार सिस्टीम'चा बाप आहे. ते अशा चित्रपट कुटुंबातून येतात जे गेल्या ५० वर्षांपासून या इंडस्ट्रीत आहेत. सलमान ही परंपरा पुढे नेत आहे. हे लोक शिक्षा देणारे आहेत. ते संपूर्ण प्रक्रियेवर नियंत्रण ठेवतात. जर तुम्ही त्यांच्याशी सहमत नसाल, तर ते तुमच्या मागे लागतात.
'दबंग' सिनेमाबद्दल
अभिनव कश्यप हे 'दबंग' चित्रपटाचे दिग्दर्शक होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटातून सोनाक्षी सिन्हाने पदार्पण केलं होतं आणि त्यात मलाइका अरोराचं एक आयटम साँग होतं. अरबाज खानने या चित्रपटाची निर्मिती केली होती. चित्रपटात सोनू सूद खलनायकाच्या भूमिकेत होते, तर डिंपल कपाडिया, ओम पुरी, अनुपम खेर आणि महेश मांजरेकर यांसारखे स्टार्सही होते. 'दबंग' या चित्रपटाचे आणखी दोन भाग आले आहेत. दुसरा भाग २०१२ मध्ये आणि तिसरा भाग २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता.