कोटींची कमाई करणारा सलमान खान स्वतःवर खर्च करतो केवळ एवढे रुपये, तुम्हालाही वाटेल आश्चर्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 19:50 IST2019-03-26T19:50:00+5:302019-03-26T19:50:00+5:30
बॉलिवूडचा दबंग खान सलमानची गिनती सर्वात यशस्वी व लोकप्रिय सेलेब्समध्ये होते. मात्र सलमानचे म्हणणे आहे की तो स्टारडमला जास्त सीरियसली घेत नाही.

कोटींची कमाई करणारा सलमान खान स्वतःवर खर्च करतो केवळ एवढे रुपये, तुम्हालाही वाटेल आश्चर्य
बॉलिवूडचा दबंग खान सलमानची गिनती सर्वात यशस्वी व लोकप्रिय सेलेब्समध्ये होते. मात्र सलमानचे म्हणणे आहे की तो स्टारडमला जास्त सीरियसली घेत नाही. बॉलिवूड सेलेब्सचे जीवन खूप रॉयल असते आणि फक्त त्यांचेच नाही तर त्यांची मुले देखील आलिशान जीवन जगतात. मात्र सलमान खानचे जीवन त्यांच्यापेक्षा खूप वेगळे आहे. असे आम्ही नाही तर खुद्द स्वतः तो म्हणतो आहे.
एका मुलाखतीत सलमान खानने सांगितले की, 'मी माझ्या स्टारडमकडे गांभीर्याने पाहत नाही. मी स्टारसारखा वागत नाही. लोकांना मी स्टार वाटतो.'
या मुलाखतीत सलमान जे म्हणाला ते ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. तो म्हणाला की, 'मी ५५० रुपयाचे टीशर्ट परिधान केला आहे आणि माझी जिन्स पंधरा वर्षांपूर्वीची आहे. हे शूज जवळपास वीस वर्षांपूर्वीचे आहेत. लोक मी साकारलेल्या भूमिकांमुळे मला स्टारसारखे ट्रीट करतात.'
बॉलिवूडमध्ये इतके वर्ष व्यतित केल्यानंतर मला आता स्क्रीप्ट निवडण्याचे स्वातंत्र्य मिळाल्याचे सलमान सांगतो व पुढे म्हणाला की, 'सूरज बडजात्या, माझे वडील आणि दीपक बेहरी यांच्यामुळे मी कलाकार झालो. मी बऱ्याच दिग्दर्शक व लेखकांसोबत काम केले आहे. त्यातून मी शिकलो की कोणत्या प्रोजेक्टमध्ये काम केेले पाहिजे की नाही. त्यामुळे मी स्टार नाही तर मी ज्या स्क्रीप्ट्स निवडतो त्या स्टार आहेत. मी ज्या लोकांसोबत काम करायचे ठरविले त्या लोकांनी मला स्टार बनविले आहे.'
सलमान खानचा आगामी 'भारत' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कतरिना कैफ मुख्य भूमिकेत झळकणार आहे.