सलमान खान हाजीर हो...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2016 15:07 IST2016-06-29T09:37:47+5:302016-06-29T15:07:47+5:30
सुलतान या चित्रपटाच्या प्रमोशनच्यावेळी सलमान खानने केलेल्या वक्तव्यामुळे त्याला महिला आयोगापुढे हजर राहाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याने या ...
.jpg)
सलमान खान हाजीर हो...
स लतान या चित्रपटाच्या प्रमोशनच्यावेळी सलमान खानने केलेल्या वक्तव्यामुळे त्याला महिला आयोगापुढे हजर राहाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याने या चित्रपटाच्या प्रमोशनच्यावेळी म्हटले होते की, सुलतान या चित्रपटातील आखाड्यातील दृश्यांच्या चित्रीकरणानंतर माझी अवस्था ही बलात्कार झालेल्या महिलेसारखी होत असे. या वक्तव्यामुळे सोशल नेटवर्किंगवर नेटकरींनी सलमानचा चांगलाच समाचार घेतला होता. यामुळे सगळेच सलमानवर प्रचंड भडकले होते. समाजाच्या सर्वच स्तरातून या विरोधात आवाज उठवला गेला होता. सलमानाच्या या वक्तव्यावर त्याचे वडील लेखक सलीम खान यांनी माफीही मागितली होती. पण सलमानने यावर माफी मागवी अशी मागणी करण्यात आली होती. बलात्कार पीडितींनीही सलमानला चांगलेच सुनावले होते. या वक्तव्यामुळे सलमानने सर्व महिलांचा अपमान केला असून महिलांविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्यासाठी त्याला ७ जुलैला महिला आयोगासमोर हजर राहाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाने सलमानला काही दिवसांपूर्वी नोटिस बजावली होती. या नोटिसला सलमान खानने उत्तर दिले असले तरी स्वत:ची बलात्कार पिडित महिलेशी तुलना करण्याच्या वक्तव्याबद्दल सलमानने माफी मागितलेली नाही.