आपल्या ‘या’ हिरोईनचा सलमान खानला पडला विसर!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2017 15:15 IST2017-08-17T09:44:12+5:302017-08-17T15:15:01+5:30
सलमान खान आज बॉलिवूडचा सुपरस्टार आहे. पण सलमानच्या चित्रपटातील अनेक हिरोईन्स आज कुठे आहेत? होय,सलमानच्या अनेक हिरोईन्सचा लोकांना विसर ...
(49).jpg)
आपल्या ‘या’ हिरोईनचा सलमान खानला पडला विसर!!
स मान खान आज बॉलिवूडचा सुपरस्टार आहे. पण सलमानच्या चित्रपटातील अनेक हिरोईन्स आज कुठे आहेत? होय,सलमानच्या अनेक हिरोईन्सचा लोकांना विसर पडलाय. खरे तर सलमानसोबत अनेकजणींना संधी मिळाली. काहींना तर स्वत: सलमाननेच शोधून काढले. पण सल्लूने अनेकींना हिरा शोधून आणावा तसे आणले, अन् मग एक-दोन चित्रपटानंतर या हिरोईन्स अचानक गायब झाल्यात. अशीच एक हिरोईन म्हणजे, चांदनी. होय, ‘सनम बेवफा’ हा सलमानचा चित्रपट तुम्हाला आठवतं असेलच. या चित्रपटात सलमानच्या अपोझिट चांदनी होती. सलमानचा हा चित्रपट बराच गाजला. पण या चित्रपटानंतर चांदनी अचानक बॉलिवूडच्या आकाशातून लुप्त झाली. इतका मोठा ब्लॉकबस्टर दिल्यानंतरही चांदनी बॉलिवूडमध्ये टिकू शकली नाही. चांदनीच्या वाट्याला नाही म्हणायला दहा-एक सिनेमे आलेत. पण या सिनेमानंतर चांदनी बॉलिवूडमधून गायब झाली.
![]()
चांदनीचे खरे नाव नवोदिता शर्मा आहे. बॉलिवूडनेच तिचे हे नाव बदलून तिला चांदनी असे नवे नाव दिले. सलमानसोबत काम केले आणि यानंतर चांदनीच्या करिअरला उतरती कळा लागली. करिअरच्या या टप्प्यावर चांदनीने लग्न केले अन् ती विदेशात स्थायिक झाली. चांदनीला दोन मुलीही झाल्या. या मुलींचे नाव तिने करिश्मा व करिना ठेवलेयं. यामागचे कारण म्हणजे, बॉलिवूडप्रतीचे तिचे प्रेम अद्यापही कमी झालेले नाहीयं. पण यानंतर चांदनीच्या वाट्याला कुठल्याही भूमिका आल्या नाहीत.
सध्या चांदनी विदेशात डान्स शिकवून पैसा कमवते आहे. विदेशात मुलींना ती क्लासिकल डान्स शिकवते. क्लासिकलसोबत चांदनी वेस्टर्न डान्समध्येही ती पारंगत आहे. पण डान्समध्ये करिअर करण्याच्या काळात तिला बॉलिवूड खुणावू लागले आणि ती बॉलिवूडमध्ये आली. ‘हिना’,‘सनम बेवफा’ हे तिचे चित्रपट तुफान गाजलेत. पण यानंतर चांदनीला चित्रपट मिळेनासे झालेत आणि सलमानची एक हिरोईन विस्मृतीत गेली...!