'टायगर जिंदा है'च्या शूटिंगनंतर काय करणार आहे सलमान खान...वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 16:49 IST2017-09-15T11:19:10+5:302017-09-15T16:49:10+5:30

दबंग खान म्हणजेच सलमान खान ची ट्यूबलाईट चित्रपट फ्लॉप झाला आहे त्यानंतर सलमान खान चित्रपटांची निवड विचारपूर्वक करतो आहे. ...

Salman Khan is going to do after shooting 'Tiger Jinde Hai' ... Read More Detail | 'टायगर जिंदा है'च्या शूटिंगनंतर काय करणार आहे सलमान खान...वाचा सविस्तर

'टायगर जिंदा है'च्या शूटिंगनंतर काय करणार आहे सलमान खान...वाचा सविस्तर

ंग खान म्हणजेच सलमान खान ची ट्यूबलाईट चित्रपट फ्लॉप झाला आहे त्यानंतर सलमान खान चित्रपटांची निवड विचारपूर्वक करतो आहे. सध्या सलमानकडे चित्रपटाची लाईन आहे. सध्या सलमान खान 'टायगर जिंदा है'च्या अंतिम टप्पा शूट करण्यात व्यस्त आहे. सध्या सलमान कॅटरिना कैफ सोबत आबुधाबीमध्ये चित्रपटाचा क्लायमॅक्स शूट करतो आहे. हा चित्रपट ख्रिसमस मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ट्यूबलाईट चित्रपटानंतर सलमानने लगेच 'टायगर जिंदा है'चे शूटिंग सुरू केले. गेल्या 45 दिवसांपासून तो आबुधाबीमध्ये शूटिंग करतो आहे. आबुधाबी आधी इतर देशांमध्ये जाऊन या चित्रपटाचे शूटिंग करण्यात आले आहे. यात ब्रेकअपनंतर तब्बल पाच वर्षानंतर सलमान आणि कॅटरिनाची जोडी जमणार आहे. शूटिंग संपल्यानंतर सलमान लगेच पुढच्या चित्रपटाच्या तयारीला लागेल असे तुम्हाला जर वाटत असेल तर ते चुकीचे आहे. तो  तसे करणार नाहीय. सूत्रांच्या माहितीनुसार सलमान खान अजिबात काम करण्याच्या मूडमध्ये नाही आहे तो सुट्टीच्या मूडमध्ये आहे.

सलमान पुढचा प्रोजेक्ट सुरू करायचा आधी कमीत कमी १० दिवस सुट्टीवर जाणार आहे. ते पण त्याच्या आवडत्या ठिकाणी म्हणजेच त्याच्या पनवेल येथील फार्म हाऊसवर, जेव्हा जेव्हा सलमानला त्याच्या कामामधून  ब्रेक हवा असतो तेव्हा तो थेट पनवेलच्या फार्म हाऊसमध्ये जाऊन आराम करतो, आणि त्याच्या आवडत्या गोष्टी करत असतो. एका रिपोर्टनुसार सलमान टायगर जिंदा है च्या शूटिंगनंतर फार्म हाऊसवर जाऊन यावेळी ही तेच करणार आहे. त्यात घोडेस्वारी, स्वदेशी जेवण , नदीवर जाऊन अंघोळ, मोकळ्या हवेत व्यायाम, त्याच्या आवडत्या लोकांना भेटणे या सगळ्या गोष्टींचा यात समावेश आहे. 

ALSO READ : जॉन अब्राहमला डच्चू दिल्यानंतर सलमान खानने साइन केला 'रेस ३' आणि मागितले ७०% प्रॉफिट

आता प्रश्न हा आहे की सलमान सुट्टी वरून परतल्यावर कोणत्या चित्रपटाच्या तयारीला आधी सुरुवात करणार कारण त्याच्याकडे सध्या यानंतर 3 चित्रपट आहेत. ते म्हणजे  रेस ३,  किक २ कि दबंग ३. याचे उत्तर आपल्याला सलमान सुट्टीवरुन परतल्यावरट मिळेल.  

Web Title: Salman Khan is going to do after shooting 'Tiger Jinde Hai' ... Read More Detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.