आजवर लग्न का केलं नाही? 'बिग बॉस १९'मध्ये सलमानने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला-
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 14:02 IST2025-08-25T13:57:32+5:302025-08-25T14:02:22+5:30
'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरमध्ये सलमानने लग्न का केलं नाही, यामागचं कारण सांगितलं आहे. काय म्हणाला भाईजान?

आजवर लग्न का केलं नाही? 'बिग बॉस १९'मध्ये सलमानने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला-
'बिग बॉस १९'ची काल सुरुवात झाली. सलमान खानने 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरचं सूत्रसंचालन करुन पुन्हा एकदा त्याचा स्वॅग दाखवला. काल 'बिग बॉस १९'च्या घरात विविध क्षेत्रातील स्पर्धक सहभागी झाले. कोणी स्टँडअप कॉमेडियन, कोणी मॉडेल तर कोणी अभिनेत्री. सलमानने सर्वांचंच मनमोकळेपणाने स्वागत केलं. याशिवाय भाईजानने स्पर्धकांशी दिलखुलास संवाद साधला. यावेळी 'बिग बॉस १९'मध्ये सहभागी झालेल्या तान्या मित्तलसोबत सलमानने साधलेला संवाद सर्वांच्या लक्षात राहिला. त्यावेळी सलमानने लग्न का केलं नाही? याचा खुलासा केला.
सलमानने लग्न का केलं नाही?
'बिग बॉस १९' च्या प्रीमियरमध्ये सलमान खानने तान्या मित्तलशी संवाद साधला. सलमानशी बोलताना तान्याने त्याला एक अतिशय प्रश्न विचारला की, "सर, खरे प्रेम नेहमी अपूर्ण का राहते?" तान्याचा हा प्रश्न ऐकून सलमानने जे उत्तर दिले, ते ऐकून सर्वच आश्चर्यचकित झाले.
सलमान खानने तान्याच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले, “खरं प्रेम, मला माहित नाही, कारण ते अजून मला झालेलं नाहीये. ना खरं प्रेम झालंय, ना काही अपूर्ण राहिलंय.” सलमानच्या या विधानाची चांगलीच चर्चा रंगली. कारण, सलमान खानचे अनेक अभिनेत्रींसोबतचे प्रेमसंबंध नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहेत. मात्र, त्याने स्वतःहून अशाप्रकारे प्रेम अपूर्ण राहिल्याची कबुली दिल्याने, त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
'बिग बॉस १९'मध्ये सहभागी झालेत हे स्पर्धक
'बिग बॉस १९'ला कालपासून सुरुवात झाली असूून शोमध्ये सहभागी झालेले स्पर्धक कोणत? जाणून घ्या. अश्नूर कौर, प्रणित मोरे, गौरव खन्ना, झीशान कादरी, तानिया मित्तल, नेहाल चुडासिमा, बसीर अली, अभिषेक बजाज, अवेझ दरबारन. नगमा मिराजकर, अमाल मलिक, कुनिका सदानंद, फरहाना भट, निलम गिरीही, नतालिया, मृदुल तिवारी या स्पर्धकांनी 'बिग बॉस १९'मध्ये एन्ट्री घेतली आहे.