सलमानची ‘चांदनी’ आता दिसते अशी, बॉलिवूडमधून अचानक झाली गायब
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2019 13:26 IST2019-12-01T13:25:12+5:302019-12-01T13:26:04+5:30
सलमान खानसोबत ‘सनम बेवफा’ या चित्रपटात काम करणारी अभिनेत्री चांदनी तुम्हाला आठवत असेलच.

सलमानची ‘चांदनी’ आता दिसते अशी, बॉलिवूडमधून अचानक झाली गायब
सलमान खानसोबत ‘सनम बेवफा’ या चित्रपटात काम करणारी अभिनेत्री चांदनी तुम्हाला आठवत असेलच. चांदनीचा हा पहिला सिनेमा होता. हा पहिलाच सिनेमा सुपरडुपर हिट झाला. पण यानंतर चांदनीच्या वाट्याला एकही हिट सिनेमा आला नाही. ‘सनम बेवफा’नंतर आलेले तिचे सर्व सिनेमे फ्लॉप झालेत आणि एक दिवस ती अचानक बॉलिवूडमधून बाद झाली. 1991 ते 1996 या काळात तिने एकूण 10 सिनेमे केलेत.
ही चांदनी आज कुठे आहे आणि कशी दिसते, हे तुम्हाला माहित आहे? चांदनी विदेशात डान्स इन्स्टिट्युट चालवत आहे. चांदनीचे खरे नाव हे नवोदिता शर्मा असे असून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी तिचे नाव बदलले होते. चांदनी सध्या युएसमध्ये राहात असून ती आॅरलॉडो शहरात डान्स क्लास चालवते.
चांदनी ही खूप चांगली डान्सर असून तिने खूपच लहान वयात नृत्य शिकायला सुरुवात केली होती. चांदनीला नृत्यामध्ये करियर करण्याची इच्छा होती. पण बॉलिवूडमध्ये येण्याचा तिने कधी विचार देखील केला नव्हता. पण ती केवळ 17 वर्षांची असताना तिला ‘सनम बेवफा’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.
चांदनीचे लग्न झाले असून तिला दोन मुली आहेत. चांदनी आज बॉलिवूडमध्ये कार्यरत नसली तरी तिचे बॉलिवूडवरील प्रेम थोडेदेखील कमी झालेले नाही. तिने तिच्या मुलींची नावे ही करिश्मा आणि करिना अशी ठेवली आहे. यातूनच तिचे बॉलिवूडवरचे प्रेम दिसून येते.