तुम्ही, सलमान खान-कॅटरिना कैफच्या जोडीचे फॅन आहात मग ही बातमी वाचाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 12:24 IST2019-03-25T12:14:23+5:302019-03-25T12:24:29+5:30

सलमान खानचा आगामी सिनेमा भारतची घोषणा झाल्यापासून रोज कोणत्याना कोणत्या कारणाला घेऊन चर्चेत आहेत. सलमानचे फॅन्स या सिनेमाच्या ट्रेलरची वाट मोठ्या उत्सुकतेने बघतायेत

Salman khan film bharat trailer will be release in april 3rd week director ali abbas zafar revealed | तुम्ही, सलमान खान-कॅटरिना कैफच्या जोडीचे फॅन आहात मग ही बातमी वाचाच!

तुम्ही, सलमान खान-कॅटरिना कैफच्या जोडीचे फॅन आहात मग ही बातमी वाचाच!

ठळक मुद्देभारतचे सध्या पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरु आहेसिनेमाची टीम आता लवकरात लवकर ट्रेलर रिलीज करण्याच्या तयारीला लागली आहे

सलमान खानचा आगामी सिनेमा भारतची घोषणा झाल्यापासून रोज कोणत्याना कोणत्या कारणाला घेऊन चर्चेत आहेत. सलमानचे फॅन्स या सिनेमाच्या ट्रेलरची वाट मोठ्या उत्सुकतेने बघतायेत. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा टीझर रिलीज झाला होता, या टीझरला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. आता या सिनेमाशी संबंधीत आणखी एक माहिती समोर येतेय. दिग्दर्शक अली अब्बास जफरने 'भारत'चा ट्रेलर कधी रिलीज होणार यावरुन पडदा उचलला आहे. 



भारतचे सध्या पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरु आहे. नुकतंच सिनेमाची शूटिंग संपली आहे. त्यामुळे सिनेमाची टीम आता लवकरात लवकर ट्रेलर रिलीज करण्याच्या तयारीला लागली आहे. अली अब्बास जफरने ट्वीट करत सांगितले आहे की, ''भारत सिनेमाच्या ट्रेलरची रिलीज डेट लॉक करण्यात आली आहे. पोस्ट प्रोडक्शनचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात ट्रेलर रिलीज होईल. हा एक खूपच स्पेशल सिनेमा आहे. आम्ही नव्हर्स आणि उत्साहित आहोत.''        


सलमानचा 'भारत' ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात भाईजानच्या अपोझिट कॅटरिना कैफ दिसणार आहे. यात दिशा पटानी आणि जॅकी श्रॉफ यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘भारत’ हा चित्रपट ‘आॅड टू माई फादर’ या कोरियन चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. ‘भारत’  हा सिनेमा हिंदीशिवाय, तमिळ, तेलगू आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे. मेकर्सना हा सिनेमा लिमिटेड आॅडियन्सपर्यंत सीमित ठेवायचा नसल्यामुळे भारताला अन्य भाषांमध्ये सुद्धा रिलीज करण्यात येणार आहे. 

Web Title: Salman khan film bharat trailer will be release in april 3rd week director ali abbas zafar revealed