सनी देओलच्या 'या' सिनेमात सलमान खानची एन्ट्री! ७ वर्षांनंतर एकत्र करणार धमाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 12:10 IST2025-11-20T12:09:59+5:302025-11-20T12:10:46+5:30
पहिल्यांदा 'या' सिनेमात केलं होतं एकत्र काम

सनी देओलच्या 'या' सिनेमात सलमान खानची एन्ट्री! ७ वर्षांनंतर एकत्र करणार धमाल
सलमान खान आणि सनी देओल यांची मैत्री सर्वश्रुत आहे. दोघांनी ९० च्या दशकात 'जीत'सिनेमात काम केलं होतं. नंतर अनेक वर्षांनी 'हिरोज','यमला पगला दीवाना'मध्येही ते दिसले. आता पुन्हा सलमान आणि सनी देओल सिनेमात एकत्र दिसणार आहेत. सनी देओलच्या सिनेमात सलमान खानही एन्ट्री झाली आहे. सनीच्या 'गबरु' सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. याच सिनेमात सलमान खानही दिसणार आहे.
'बॉलिवूड हंगामा'च्या रिपोर्टनुसार, सनी देओलच्या 'गबरु' सिनेमात एका स्टारची गरज होती. मेकर्सने सलमान खानला सिनेमात घेण्याचा प्लॅन बनवला आहे. सलमानच यासाठी योग्य असल्याचं सर्वांचं म्हणणं आहे. त्याला सिनेमासाठी अप्रोचही करण्यात आलं आहे आणि त्यालाही स्क्रिप्ट आवडली आहे. सलमान यामध्ये एक छोटा कॅमिओ करमार आहे.
शशांक उदापुरक 'गबरु' सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. सनी देओलसोबत समिरन बग्गा मुख्य भूमिकेत दिसमार आहे. तर सलमानसोबत सनीचे कमीत कमी ३ सीन्स असतील अशी चर्चा आहे. सिनेमाच्या स्क्रिप्टची डिमांड बघता कॅमिओची लांबी वाढूही शकते.
सलमान खान आगामी 'बॅटल ऑफ गलवान' सिनेमात दिसणार आहे. तर सनी देओलचा 'बॉर्डर २' रिलीज होणार आहे. शिवाय तो आमिर खान निर्मित 'लाहोर १९४७'मध्येही दिसणार आहे.