"तो फक्त त्यांच्यावरच दयाळू आहे, जे..." मध्यरात्री सलमान खानची पोस्ट, चाहत्यांनी हेरली 'ही' गोष्ट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 10:05 IST2025-07-04T10:00:29+5:302025-07-04T10:05:09+5:30
सलमान खानची गूढ पोस्ट चर्चेत, नेमकं काय म्हणाला?

"तो फक्त त्यांच्यावरच दयाळू आहे, जे..." मध्यरात्री सलमान खानची पोस्ट, चाहत्यांनी हेरली 'ही' गोष्ट!
Salman Khan Drops Cryptic Note: बॉलिवूडचा 'भाईजान' अशी ओळख असलेला अभिनेता सलमान खान हा हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याचे केवळ भारतातच नाही तर जगभरात असंख्य चाहते आहेत. तो नेहमीच चर्चेत असतो. सलमानबद्दलची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी त्याच्या चाहत्यांची उत्सुकता नेहमीच शिगेला असते. अशातच आता सलमानची एक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
सलमानने काल मध्यरात्री इन्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तो निळ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये स्टायलिश पोज देताना दिसतो. या फोटोसोबत त्याने एक प्रेरणादायी संदेश लिहला आहे. "योग्य दिशेने कठोर परिश्रम करा. कारण, तो (देव) त्यांच्यावरच दयाळू आहे. त्याच्यातील कौशल्यानं तो त्यांना त्या क्षेत्रातील निष्णात व्यक्ती बनवतो", असं सलमान खाननं म्हटलं.
विशेष गोष्ट म्हणजे सलमानच्या या पोस्टमध्ये चाहत्यांनी एक गोष्ट हेरली. ती म्हणजे फोटोत सलमानच्या पाठीमागे एका टेबलावर सलमानचं पोस्टर दिसून आलं. हे पोस्टर पाहिल्यानंतर ते सलमानच्या आगामी चित्रपटाचं असावं असा अंदाज चाहत्यांनी व्यक्त केलाय. एका युजरनं कमेंट करत लिहलं, "भाईच्या नव्या चित्रपटाचा हिंट मिळतोय फोटोतून!".
सलमानचा काही दिवसांपुर्वी 'सिकंदर' चित्रपट प्रदर्शित झाला होता. पण, हा चित्रपट फारसा प्रभाव पाडू शकला नाही. 'सिकंदर' फ्लॉप झाल्यानंतरही सलमानने हार मानलेली नाही. उलट तो पुढच्या प्रोजेक्टसाठी सज्ज झाला आहे. 'सिकंदर'नंतर सलमान खान अपूर्व लाखियाच्या आगामी युद्धपटात झळकणार आहे. या चित्रपटात सलमान हा कर्नल संतोष बाबू यांची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाची कथा २०२० मधील गलवान व्हॅली संघर्षावर आधारित आहे. देशभक्तीने भरलेला आणि तगड्या अभिनयाची झलक असलेला हा चित्रपट सलमानच्या करिअरमधील एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो.