सलमान खानच्या इन्स्टाग्राम फॉलोवर्सने पार केला इतक्या कोटींचा टप्पा, ठरला तिथेही सुपरस्टार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 15:17 IST2020-03-02T15:10:16+5:302020-03-02T15:17:11+5:30
सलमान फॅन्सना सॅल्यूट करुन हात जोडून अभिनंदन करताना दिसतोय.

सलमान खानच्या इन्स्टाग्राम फॉलोवर्सने पार केला इतक्या कोटींचा टप्पा, ठरला तिथेही सुपरस्टार
बॉलिवूड अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील व्हिडीओमुळे. त्याचे झाले असे की, सलमान खानच्या इन्स्टाग्रामवर फॉलोवर्सने तीन कोटींचा आकडा पार केला आहे. त्यामुळे व्हिडीओच्या माध्यमातून सलमानने आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. बूमरँग व्हिडीओमध्ये सलमान फॅन्सना सॅल्यूट करुन हात जोडून अभिनंदन करताना दिसतोय.
सलमानने या व्हिडीओला त्यांचा सिनेमा 'अंदाज अपना अपना'मधील, ऊई मां, तीस मिलियन, आप सभी को थैंक्यू।' हा डायलॉग कॅप्शन म्हणून दिला आहे.
वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर सलमान सध्या 'राधे : इंडियाज मोस्ट वॉण्टेड' सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या सिनेमात सलमानसोबत दिशा पटानी दिसणार आहे. प्रभूदेव या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. सिनेमात सलमान एका हटके भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे.
हा सिनेमा ईदच्या दिवशी म्हणजेच 22 मे ला प्रदर्शित होणार आहे. यात अभिनेता जॅकी श्रॉफ देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. सलमान खान फिल्मच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती सोहेल खान आणि रील लाइफ प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड करत आहे.