"सलमान खान फूड ट्रक घेऊन सेटवर...", प्रसिद्ध कोरिओग्राफरने सांगितला सेटवरचा किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 10:58 IST2025-11-20T10:57:24+5:302025-11-20T10:58:18+5:30
तमन्ना भाटियाच्या आयटम साँगचाही सांगितला किस्सा

"सलमान खान फूड ट्रक घेऊन सेटवर...", प्रसिद्ध कोरिओग्राफरने सांगितला सेटवरचा किस्सा
बीटाऊनमध्ये आजकाल स्टार्सचे नखरे, मानधन याची बरीच चर्चा असते. अगदी करण जोहरही यावर कलाकारांविरोधात बोलला आहे. कित्येक स्टार्स आपले वैयक्तिक खर्चही प्रोडक्शनकडून वसूल करतात. पण सलमान खान, आमिर खान याबाबतीत वेगळे आहेत. ते आपले खर्च स्वत:च उचलतात. सलमान तर स्वत:चा फूड ट्रक सेटवर घेऊन येतो असं नुकतंच एका कोरिओग्राफरने सांगितलं.
पीयूष भगत आणि शाजिया सामजी हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर आहेत. नुकतंच हिंदी रशला दिलेल्या मुलाखतीत शाजिया सामजी म्हणाल्या, "जेव्हा सलमान खानने आम्हाला सेटवर बोलवलं तेव्हा सर्वांना हे माहित होतं की सेटवर एक जेवणाचा टेंट असणार. बीइंग ह्युमन फुड ट्रक त्याच्या प्रत्येक शूटिंग सेटवर असतोच आणि त्यात खूपच स्वादिष्ट जेवण मिळतं. त्यात भाईजानसोबत आमच्यासोबत जेवायला बसला त्यामुळे अजूनच छान वाटलं."
अनन्या पांडेसोबतचा अनुभव सांगताना त्या म्हणाल्या, "अनन्याने जेव्हा स्टुडंट ऑफ द इयर २ पासून करिअरला सुरुवात केली तेव्हा ती आमच्याकडे ट्रेनिंगसाठी आली होती. येत्या काही वर्षात ती खूप प्रगती करेल. अनन्या सुपरडान्सर नाही पण ती खूप मेहनती आहे."
'रेड २'मध्ये तमन्ना भाटियाने आयटम साँग केलं जे खूप गाजलं. त्याचा अनुभव सांगताना शाजिया म्हणाल्या, "नशा गाण्यावेळी तमन्नाने फक्त ४ तास सराव केला होता. तिच्याकडे अनेक प्रोजेक्ट्स होते त्यामुळे तिला फारसा वेळ नव्हता. तिने दोन दिवस फक्त दोन तास सराव केला. ते गाणं दोन दिवसात शूटही झालं होतं."