आमिर खानचा लेक जुनैदला सलमानच्या बॉडीगार्डनं ओळखलं नाही? चाहता समजून अडवलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 14:18 IST2025-06-20T14:17:45+5:302025-06-20T14:18:27+5:30

सलमान खान आणि आमिर खानचा मुलगा जुनैद यांचा व्हिडीओही लक्ष वेधून घेत आहे.

Salman Khan Bodyguard Fails To Recognise Aamir Khan Son Junaid Khan At Sitaare Zameen Par Screening Video Viral | आमिर खानचा लेक जुनैदला सलमानच्या बॉडीगार्डनं ओळखलं नाही? चाहता समजून अडवलं!

आमिर खानचा लेक जुनैदला सलमानच्या बॉडीगार्डनं ओळखलं नाही? चाहता समजून अडवलं!

'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खानचा आज २० जून रोजी बहुप्रतिक्षीत चित्रपट 'सितारे जमीन पर' प्रदर्शित झाला आहे. काल सिनेमाचं स्पेशल स्क्रिनिंग पार पडलं. या स्क्रिनिंगला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खानही या स्क्रिनिंगला उपस्थित होता. या कार्यक्रमातील सलमान खान आणि आमिर खानचा लेक जुनैद याचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. ज्यात सलमानच्या सुरक्षा रक्षकाने जुनैदला एक सामान्य चाहता समजून अडवल्याचं दिसतंय.

सलमान खान हा 'सितारे जमीन पर'च्या स्क्रिनिंगला कडक सुरक्षा व्यवस्थेत पोहचला. यावेळी सलमान अंगरक्षकांसह जात असताना जुनैद हा सलमानची भेट घेण्यासाठी त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. पण, सुरक्षा कर्मचारी जुनैला सुपरस्टारपासून दूर ढकलतो. सोशल मीडिया यूजर्स हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. 


'सितारे जमीन पर' सिनेमा हा २००७ साली प्रदर्शित झालेल्या आणि गाजलेल्या 'तारे जमीन पर' या लोकप्रिय सिनेमाचा सीक्वल आहे. या सिनेमात आमिर आणि जिनिलीया मुख्य भूमिकेत आहेत. 'सितारे जमीन पर' हा एका स्पॅनिश सिनेमाचा रिमेक आहे. या चित्रपटात १० नवोदित कलाकार अरूष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, सम्वित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भंसाली, आशीष पेंडसे, ऋषी शाहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर यांचा विशेष सहभाग आहे. या सिनेमातून दिव्यांग मुलांच्या बास्केटबॉल टीमची गोष्ट दाखवण्यात आली आहे. 
 

Web Title: Salman Khan Bodyguard Fails To Recognise Aamir Khan Son Junaid Khan At Sitaare Zameen Par Screening Video Viral